सूत्रांनुसार फराह खान ने या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. फराह ने या अगोदर आलिया सोबत काम केले असले तरी टायगर बरोबर काम करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे.
स्टुडन्ट ऑफ द इयर २ चित्रपटासाठी आलीया भट्ट ने टायगर श्रॉफ बरोबर 'हुकप सॉंग' शूट केले
Mumbai - 09 Mar 2019 20:36 IST
Updated : 11 Mar 2019 23:01 IST
Our Correspondent
करण जोहर ने स्वतःच दिग्दर्शित केलेल्या स्टुडन्ट ऑफ द इयर (२०१२) या चित्रपटातून आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन यांना लॉन्च केले होते.
आता सात वर्षानंतर ते स्टुडन्ट ऑफ द इयर २ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. पहिल्या चित्रपटातील मुख्य कलाकार या नवीन चित्रपटात सुद्धा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसतील यावर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते.
आता एक गोष्ट मात्र नक्की झाले ती म्हणजे आलिया भट्ट या नवीन चित्रपटात दिसतील. फराह खान ने नृत्यदिग्दर्शन केलेल्या 'हुकप सॉंग' या गाण्यात त्या टायगर श्रॉफ बरोबर ताल धरणार आहेत.
बॉलिवूडहंगामा.कॉम च्या बातमीनुसार मुंबईच्या मेहबूब स्टुडिओ मध्ये नुकतेच या गाण्याचे शूट पार पडले.
त्या बातमीमध्ये एका सूत्राने सांगितले की "फराह खान ने 'हुकप सॉंग' नावाचे गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. अरियाना ग्रान्दे किंवा ब्रुनो मार्स च्या गाण्यां सारखे हे गाणे असणार आहे. हे आधुनिक पार्टी गाणे आहे आणि तुम्हाला या मध्ये आलिया आणि टायगर या दोघां मधली उत्कृष्ट केमिस्ट्री दिसून येईल. खूप मोठ्या लेवल वर या गाण्याचे शूट झाले आहे. गाण्यात आपल्याला अनेक ग्राफिक आणि ट्रेंडी सेट्स आणि अनेक निऑन लाईट्स पाहायला मिळतील. खूप कालावधी नंतर आपल्याला आलीया मनसोक्त डान्स करताना दिसतील."
फराह खान ने दिग्दर्शक पुनीत मल्होत्रा आणि टायगर श्रॉफ सोबत पहिल्यांदाच काम केले.
"टायगर एक उत्कृष्ट डान्सर आहे आणि मला आनंद आहे की आम्ही या गाण्यासाठी एकत्र काम केले," फराह खान ने वेबसाइटला सांगितले. "या गाण्यात टायगर ने गोविंदा स्टाइलचा डान्स केला आहे. मी या गाण्यासाठी खूप उत्सुक आहे."
फराह खान ने आलियाची पण खूप स्तुती केली. " 'राधा' आणि 'इश्क वाला लव' ते आता, आलियाच्या डान्सिंग मध्ये खूप सुधारणा झाली आहे. ती टायगरला डान्स मध्ये टक्कर देत होती. ती टायगर इतका चांगला डान्स करू शकत नाही ही आलियाची भीती लगेच निघून गेली."
करण जोहर दिग्दर्शित ऐ दिल है मुश्किल (२०१६) या चित्रपटात 'ब्रेकअप सॉंग' असे एक गाणे होते. आता 'हुकप सॉंग' पण तयार झाला आहे.
पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित स्टुडन्ट ऑफ द इयर २ मध्ये टायगर श्रॉफ बरोबर तारा सुटारीया आणि अनन्या पांडे या नवोदित अभिनेत्री आहेत. चित्रपट १० मे २०१९ ला रिलीज होईल.
Related topics