{ Page-Title / Story-Title }

News Hindi

अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है च्या अधिकृत रीमेक मध्ये मानव कौल आणि नंदिता दास

Read in: English | Hindi


काही वर्षां पासून निर्मिती मध्ये असलेला हा चित्रपट येत्या १२ एप्रिल ला रिलीज होईल.

Shriram Iyengar

सईद अख्तर मिर्झा यांचा १९८० मधला कल्ट चित्रपट अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है च्या रीमेक मध्ये मानव कौल प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

सौमित्र रानडे दिग्दर्शित अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है? मध्ये नंदिता दास आणि सौरभ शुक्ल यांच्या सुद्धा भूमिका आहेत. हा चित्रपट १२ एप्रिल ला रिलीज होईल.

पती पत्नी और वो (१९७८) आणि इत्तेफाक (१९६९) सारख्या रीमेक झालेल्या चित्रपटांच्या यादी मध्ये आता या चित्रपटाचे सुद्धा नाव जोडले गेले पाहिजे.

सईद अख्तर मिर्झा यांनी अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है (१९८०) चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात मुख्य भूमिका नसीरुद्दीन शाह यांची होती तर शबाना आझमी आणि स्मिता पाटील यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या.

चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेयर क्रिटिक अवॉर्ड सुद्धा मिळाला.

ही अल्बर्ट नावाच्या एका रागीट स्वभावाच्या मेकॅनिक ची गोष्ट आहे. अथक परिश्रमातून यशप्राप्ती होतेच अशी त्याची धारणा असते. पण जेव्हा त्याच्या वडिलांची मिल बंद पडते आणि त्या विरुद्ध तो आवाज उठवतो तेव्हा त्याला मिलमालकांच्या आणि पैशाच्या ताकदीचा अंदाज येतो.

सईद मिर्झा यांनी याच धर्तीवर अरविंद देसाई की अजीब दास्तान (१९७८) आणि सलीम लंगड़े पे मत रो (१९८९) असे अजून दोन चित्रपट बनवले.

चित्रपटाचे दिग्दर्शक सौमित्र रानडे यांनी यापूर्वी जजंतरम ममंतरम (२००४) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जोनथन स्विफ्ट यांच्या गिलिव्हर्स ट्रॅव्हल्स आणि महाभारतातल्या बकासुर या दोन कथांचे मिश्रण करून या चित्रपटाची कथा लिहली होती.

Related topics