राज (विद्युत जमवाल) आणि भोला नावाचा हत्ती लहानपणा पासूनचे मित्र आहेत. ते एकत्रच लहानाचे मोठे झालेत. दोघेही आपापल्या प्रजातीचे उत्कृष्ट प्रतिनिधीत्व करतात. जेव्हा भोला आणि त्याच्या प्रजातीवर एक मोठे संकट येते तेव्हा राज त्यांना वाचवण्यासाठी सज्ज होतो.
थायलंड आणि भारतात हा चित्रपट शूट झालाय. ट्रेलर मध्ये आपल्याला सर्वत्र पसरलेली हिरवळ आणि राजची सर्व हततीं बरोबर असलेली मैत्री ठळकपणे दिसते. विद्युतने ऍक्शन सीन्स मध्ये बाजी मारली आहे हे वेगळे सांगायला नको.
या कौटुंबिक चित्रपटाचे दिग्दर्शन चक रसेल ह्या हॉलिवूड दिग्दर्शकाने केले आहे. चित्रपटात विद्युत बरोबर आपल्याला पूजा सावंत आणि आशा भट हे दोन नवीन चेहरे दिसतात.
अतुल कुलकर्णी, अक्षय ओबेरॉय आणि मकरंद देशपांडे यांच्या सुद्धा चित्रपटात मह्त्वाच्या भूमिका आहेत. विनीत जैन आणि प्रीती शाहनी निर्मित जंगली ५ एप्रिल ला रिलीज होईल.