News Hindi

रोमिओ अकबर वॉल्टर ट्रेलर – एक सामान्य व्यक्ती ते स्पाय च्या भूमिकेत जॉन एब्रहम शोभून दिसतात

पाकिस्तान मध्ये गुप्तचर म्हणून काम करणाऱ्या एका भारतीय मुस्लीम व्यक्तीवर बनलेल्या चित्रपटात जॉन एब्रहम प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.

रोमिओ अकबर वॉल्टर च्या टीजर प्रमाणेच चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा तितकाच उत्कंठावर्धक आहे. टीजर मध्ये जॉन एब्रहम एका सामान्य व्यक्तीच्या भूमिकेत दिसले तर ट्रेलरमध्ये ते पाकिस्तान मध्ये हेरगिरी करण्यासाठी भारताच्या रिसर्च अँड अनालिसिस विंग तर्फे पाठवण्यात आलेल्या एका एजंट च्या रूपात आपल्या समोर येतात.

सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर बनला आहे. हे युद्ध भारताने १४ दिवसात जिंकले होते ज्यामुळे बांगलादेश हे नवे राष्ट्र जन्माला आले.

या ट्रेलरची खास गोष्ट म्हणजे जॉन च्या पात्राची खरी ओळख लपवून ठेवण्यात आली आहे. अनेक चेहरे असलेला हा माणूस आहे. त्यांचा विना दाढी लुक हा त्यांच्या स्पाय बनण्या अगोदरचा लुक आहे. पाकिस्तान मध्ये जाताच ते वेगवेगळे लुक मध्ये आपल्या समोर येतात. 'अवर हिरो, देअर स्पाय' या कॅचलाइन मुळे चित्रपटाविषयी उत्सुकता आणखी वाढते.

आर ए डब्लू (रोमिओ अकबर वॉल्टर) ही एका डबल एजंट ची कथा आहे. दिग्दर्शक रॉब्बी ग्रेवाल यांनी ट्रेलर लॉन्च च्या वेळी सांगितले की हा चित्रपट म्हणजे भारताच्या अनेक अनसंग हीरों ना श्रद्धांजली आहे. दिग्दर्शकाच्या या विधानावरून असे वाटते की हा डबल एजंट शेवटी आपला पहिला मास्टर म्हणजेच भारताच्या बाजूने उभा राहतो.

रॉबी ग्रेवाल यांनी ट्रेलर ची रचना अशी केली आहे की तो पाहताना तुम्ही सतत या कोड्यात असता की नक्की हा व्यक्ती कोण आहे?

ट्रेलरच्या सुरुवातीला आपल्याला रक्ताने चेहरा माखलेले जॉन दिसतात. त्यानंतर जॅकी श्रॉफ त्यांची रॉ च्या मिशन साठी निवड करतात. आपल्याला जॉनच्या गळ्यात तावीज दिसते. पुन्हा ट्रेलर मध्ये त्यांची आई त्यांना आपल्या म्हाताऱ्या अम्मीला विसरू नको अशी विनवणी करते, त्यावरून ते मुस्लिम आहेत असा अंदाज येतो.

ट्रेलर मध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही ज्यावरून आपल्याला जॉन डबल एजंट आहेत याचा अंदाज येईल.

मौनी रॉय आणि सिकंदर खेर ट्रेलर मध्ये अगदी काहीच क्षणासाठी दिसतात.

दिग्दर्शक रॉबी ग्रेवाल यांनी ट्रेलर मधून चित्रपटाचा सस्पेन्स यशस्वीपणे वापरला आहे आणि हेच रोमिओ अकबर वॉल्टर चे वेगळेपण आहे.

चित्रपट ५ एप्रिल ला रिलीज होणार आहे. ट्रेलर खाली पहा.