जब हॅरी मेट सेजल (२०१७) पासून प्रीतमने हिंदी चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतल्यानंतर कलंक (२०१९) मधून पुन्हा एंट्री केली. अरिजीत सिंह आणि शिल्पा राव यांनी हे गाणे गायले असले तरी या विडिओमध्ये फक्त अरिजीत सिंह यांचा आवाज ऐकू येतो.
या गाण्यात वरुण धवन ने साकारलेला जफर आणि आलिया भट्ट ने साकारलेली रूप यांचे हळुवार खुलणारे प्रेम दाखवले आहे. गाण्यात अरिजीत सिंह फॉर्म मध्ये आहेत. अमिताभ भट्टाचार्य ने 'कलंक नही इश्क है काजल पिया' सारखे सुंदर शब्द लिहलेत.
अरिजीत यांचा आवाज मधुर आहे आणि त्याला कोरस सिंगर्स ची सुद्धा चांगली साथ लाभली आहे. भारतीय संगीतात फार क्वचित वापरले जाणारे स्पॅनिश गिटार या गाण्यात वापरले आहे. गाण्याची ट्यून ओळखीची वाटते.
विडिओत रूप आणि जफरची हिरामंडीत नजरानजर होते. गाण्यात सोनाक्षी सिन्हा आदित्य रॉय कपूर यांची आणि माधुरी दीक्षित-संजय दत्त यांची जोडी सुद्धा दिसते. गाण्यात सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर दोघेही खुश आहेत तर दत्त मात्र माधुरी वर नाराज दिसत आहेत.
अभिषेक वर्मन दिग्दर्शित स्वातंत्रपूर्व काळातील ही कथा आपल्याला १७ एप्रिल पासून चित्रपटगृहात पाहायला मिळेल.