{ Page-Title / Story-Title }

News Hindi

पीएम नरेंद्र मोदी गाणे: 'नमो नमो' इलेक्शन कॅम्पेन साठी केलेला विडिओ आहे असे वाटते

Read in: English | Hindi


पेरी जी आणि चित्रपटपाचे निर्माते संदीप सिंह ने गाणे गायले आहे.

Keyur Seta

पीएम नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचा इलेक्शन कॅम्पेन आहे अशा चर्चा मीडिया आणि सोशल मीडिया वर होत आहे. निर्मात्यांनी साहजिकच हे सर्व आरोप नाकारले आहेत. नुकतेच रिलीज झालेले 'नमो नमो' गाणे जणू भारतीय जनता पक्षाचे इलेक्शन कॅम्पेनच आहे.

गाण्यात हजारोंच्या संख्येने नरेंद्र मोदी समर्थक त्यांच्या इलेक्शन रॅली ला मोदींचा मास्क घालून हातात भाजपचा झेंडा घेऊन उपस्थित आहेत असे दाखवले आहे.

गाण्यात मोदी एका व्यक्तीने टॉयलेट मध्ये थुंकल्यानंतर त्याला ते साफ करायला लावतात असा हास्यास्पद सीन आहे. विवेक ओबेरॉय ट्रेलरपेक्षा या गाण्यात मोदी म्हणून जास्त शोभतात.

'नमो नमो' हे एक रॅप गाणे आहे. पेरी जी ने उत्स्फूर्तपणे गाणे गायले आहे. हितेश मोडक यांचे संगीत ताल धरायला लावते.

चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह या चित्रपटाद्वारे गायन क्षेत्रात पदार्पण करणार अशी बातमी आली होती. पण गाण्यात त्यांनी एकच ओळ गायली असून ती कोरसमध्ये वापरली आहे.

Related topics

Song review