News Marathi

स्मिता तांबे ची प्रमुख भूमिका असलेला सावट ५ एप्रिल ला रिलीज होणार

सावट मध्ये स्मिता तांबे पोलीस इन्स्पेक्टर ची भूमिका साकारत आहेत जी महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावात गेल्या सात वर्षात झालेले सात खुनामागचे रहस्य उलगडायला आली आहे.

दिग्दर्शक सौरभ सिन्हा चा मराठी चित्रपट सावट अगोदर २२ मार्च ला रिलीज होणार होता परंतु आता त्याची रिलीज डेट पुढे ढकलली आहे त्यामुळे आता तो ५ मार्च ला रिलीज होणार आहे.

निर्मात्यांनी अगोदरच चित्रपटाचा टीजर आणि ट्रेलर रिलीज केला आहे. सावट मध्ये स्मिता तांबे पोलीस इन्स्पेक्टर ची भूमिका साकारत आहेत जी महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावात गेल्या सात वर्षात झालेले सात खुनामागचे रहस्य उलगडायला आली आहे.

गावकऱ्यांच्या मते यामागे कोणी अदृश्य शक्ती आहे पण तांबेंचा यासारख्या गोष्टींवर विश्वास नाही. तिच्या लक्षात येतं की हे सर्व मृत्यू हिंदू कॅलेंडरनुसार एकाच दिवशी झाले आहेत.

नुकत्याच रिलीज झालेल्या टीजरमध्ये तांबे चे ज्युनियर इन्स्पेक्टर एका गावकर्याची चौकशी करत आहेत, गावकऱ्याला अदृश्य शक्तीचा भास होतो पण पोलीस अधिकारी त्याची चेष्टा करू लागतात. पोलीस अधिकारी मारवल सुपरहिरो कॅप्टन अमेरिका, आयर्नमॅन आणि थॅनॉसचा उल्लेख करतात.

विडिओत एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे कलाकारांच्या ओठांचे हालचाल आणि शब्द एकमेकांशी मॅच होत नाहीत.

सावट हा दिग्दर्शक सौरभ सिन्हा यांचा पहिलाच चित्रपट आहे. या अगोदर त्यांनी शॉर्ट फिल्म्स चे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. टीजर खाली पहा.