मुक्ता विवाहापूर्वी च्या इव्हेंट्स शूट करणाऱ्या वेडिंग फिल्ममेकर ची भूमिका साकारत आहेत.
वेडिंग चा शिनेमा विषयी मुक्ता बर्वे म्हणाल्या: मला वाटले सलील कुलकर्णी मला एखादी गंभीर भूमिका देतील
मुंबई - 27 Mar 2019 11:50 IST
Updated : 01 Apr 2019 21:46 IST
Keyur Seta
डॉ सलील कुलकर्णींच्या वेडिंग चा शिनेमा मध्ये विवाहापूर्वी इव्हेंट्स शूट करणाऱ्या फिल्ममेकरची कथा आहे. २६ मार्च ला ट्रेलर लॉन्च दरम्यान पत्रकारांशी बोलताना सलील कुलकर्णी बोलले की गणपती विसर्जनाच्या डान्स न करणाऱ्या लोकांना पाहून त्यांना हा विषय सुचला.
"आपल्याला त्यांना डान्स करायला आग्रह करावा लागतो आणि एकदा ते डान्स करायला लागले की आपल्या लक्षात येते की तेच सगळ्यात चांगला डान्स करतात. मी सोशल मीडियावर लग्नापुर्वीच्या इव्हेंट्स चे अनेक विडिओ पहिले आहेत. त्यामुळे मी हे दोन विषय एकत्र करायचे ठरवले.
"असाच एका विवाहापूर्वी सोहळ्याचे विडिओ शूट करायला आलेल्या एका फिल्ममेकरची ही गोष्ट आहे. तिच्या मनात काय चालू आहे आणि यादरम्यान तिला जगाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन मिळतो अशी चित्रपटाची कथा आहे."
सासवड वरून आलेला प्रकाश (शिवराज वायचळ) आणि मुंबईची डॉ परी (ऋचा इनामदार) यांच्या लग्नाच्या तयारी भोवती हा चित्रपट फिरतो. ते दोघेही प्रेमात पडतात आणि लग्न करायचं ठरवतात.
मुक्ता बर्वे त्या दोघांचे लग्नाचे विडिओ शूट करण्यासाठी आल्या आहेत. त्या खूप विचारपूर्वक कोणताही प्रोजेक्ट निवडतात असे त्यांचे नावलौकिक आहे. हा चित्रपट निवडण्याचे कारणसुद्धा त्यांनी सांगितले, "मला वाटते की या चित्रपटातून खूप काही सांगायचा प्रयत्न केला आहे. माझी भूमिका खूप वेगळी आहेच. पण मला वाटले की दिग्दर्शकला या चित्रपटातून काहीतरी सांगायचे आहे म्हणून मी चित्रपटाला होकार दिला."
मुक्ता बर्वेंनी गेल्या वर्षी आम्ही दोघी, मुंबई-पुणे-मुंबई ३ आणि रणांगण या चित्रपटात काम केले.
कुलकर्णी संगीत दिग्दर्शक आहेत. आणि ते ज्या पद्धतीची गाणी बनवतात त्याच्या पेक्षा अगदी विपरीत या चित्रपटाचा विषय आहे. त्यामुळे मुक्ता बर्वे थोड्या आश्चर्यचकित झाल्या होत्या.
"त्यांची गाणी ऐकल्यावर मला वाटले की ते मला एखादा गंभीर भूमिकेची ऑफर देतील, परंतु चित्रपटाची स्क्रिप्ट वाचताना मी खूप हसत होते. चित्रपटातून विनोदी पद्धतीने संदेश दिला आहे."
कुलकर्णी म्हणाले की चित्रपटात मुलगा-मुलगी प्रेमात पडतात अश्या काही गोष्टी दाखवण्यात वेळ वाया घालवण्याचे टाळले आहे. "बहुतेकदा आपण पाहतो की हिरो मुलीच्या मागे लागला आहे, शेवटी त्याला वैतागून मुलगी त्याला होकार देते, हे सर्व पाहून आपण विचार करत असतो की पुढे काय होणार ते माहिती आहे. लवकर कथानक पुढे न्या. म्हणूनच चित्रपट सुरु झाल्यावर सात मिनिटांमध्ये त्यांचे लग्न ठरते आणि शेवटच्या पाच मिनिटांमध्ये त्यांचे लग्न होते, असे आम्ही दाखवले आहे," कुलकर्णी म्हणाले.
वेडिंग चा शिनेमा १२ एप्रिल ला रिलीज होईल.
Related topics