{ Page-Title / Story-Title }

News Hindi

साजिद नाडियादवाला निर्मित चित्रपटामध्ये तारा सुतारीया आणि अहान शेट्टी एकत्र

Read in: English


आर एक्स १०० या तेलगू चित्रपटाचा ऑफिशियल रीमेक असलेल्या या चित्रपटाचे शीर्षक अजून निश्चित केलेले नाही.

Sonal Pandya

अभिनेत्री तारा सुतारीयाला आणखी एक चित्रपट मिळाला आहे. यावेळी त्या साजिद नाडियादवाला निर्मित चित्रपटामध्ये अहान शेट्टी बरोबर अभिनय करणार आहेत.

अहान शेट्टी हे सुनील शेट्टींचे पुत्र आहेत आणि या चित्रपटातून ते चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत.

कार्तिकेय रेड्डी आणि पायल राजपूत यांची प्रमुख भूमिका असलेला सुपरहिट तेलगू चित्रपट आर एक्स १०० चा हा ऑफिशियल रीमेक आहे. मिलन लुथरिया चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

पत्रकार परिषदेत लुथरिया म्हणाले, "चित्रपटाचे कथानक खूप इंटरेस्टिंग आहे, प्रेक्षकांना अचंबित सोडेल अशी ही लव्ह स्टोरी आहे. मी या दोघांना कार्यशाळेमध्ये अभिनय करताना पाहिलं आहे आणि त्यांची केमिस्ट्री अफलातून आहे. आम्ही शूटिंगसाठी तयार आहोत."

अजय भूपती दिग्दर्शित आर एक्स १०० हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे.

निर्मात्यांनी आपल्या अधिकृत विधानात म्हटले, "आम्हाला आमची हेरॉईन मिळाली आहे, तारा टॅलेंटेड अभिनेत्री आहे, मला वाटतं या दोघांची जोडी पडद्यावर शोभून दिसेल आणि प्रेक्षकांना पण पसंतीस पडेल. आम्ही जून महिन्यापासून चित्रपटाच्या शूटिंग ला सुरुवात करू."

निर्मात्यांनी डेहराडून, मसूरी, ह्रिषीकेश ही ठिकाणे शूटिंगसाठी निवडली आहेत.

सुतारीया टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडे यांच्याबरोबर स्टुडन्ट ऑफ द इयर २ (२०१९) मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. त्यांनी आपला दुसरा चित्रपट मरजावां ची सुद्धा शूटिंग पूर्ण केली आहे.

फॉक्स स्टार स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची पटकथा रजत अरोरांनी लिहली आहे.

Related topics