आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता चे पुरस्कार पटकावले तर रणवीर सिंह आणि आयुष्मान खुराणा यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड मिळाला.
फिल्मफेयर अवॉर्ड्स – आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि रणवीर सिंह यांनी पुरस्कारांवर मारली बाजी
मुंबई - 25 Mar 2019 11:07 IST
Updated : 22:55 IST
Shriram Iyengar
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे खऱ्या अर्थाने पावर कपल शोभतात हे त्यांनी २३ मार्च ला मुंबईत पार पडलेल्या ६४व्या फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यामध्ये अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री हे पुरस्कार पटकावून सिद्ध केले.
रणबीर कपूर यांना संजू (२०१८) साठी तर आलिया भट्ट यांना राझी (२०१८) साठी पुरस्कार मिळाला.
रणवीर सिंह आणि आयुष्मान खुराणा या दोघांना क्रिटिक्स चॉईस सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून मिळाला. रणवीर सिंह यांना पद्मावत (२०१८) साठी तर आयुष्मान यांना अंधाधुन (२०१८) साठी हा पुरस्कार मिळाला.
नीना गुप्ता यांना त्यांच्या बधाई हो (२०१८) मधल्या अप्रतिम अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड मिळाला. नीना गुप्ता यांचा हा पहिलावहिला फिल्मफेयर पुरस्कार आहे.
राझी (२०१८) ने अतिशय महत्वाच्या पुरस्कारांवर बाजी मारली. राझी साठी मेघना गुलझार यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक चा पुरस्कार मिळाला त्याच बरोबर राझी ने सर्वोत्कृष्ट चित्रपटचा पुरस्कार ही जिंकला.
श्रीराम राघवन यांना अंधाधुन साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा क्रिटिक्स चॉईस पुरस्कार मिळाला. पूजा लढा सुरती यांनी अंधाधुन साठीच सर्वोत्कृष्ट संकलकाच्या पुरस्कारावर बाजी मारली. श्रीराम राघवन, अरिजित बिस्वास, पूजा लढा सुरती, योगेश चांदेकर, हेमंत राव यांना अंधाधूंसाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला.
सारा अली खान यांना केदारनाथ (२०१८) साठी सर्वोत्कृष्ट पदार्पण (स्त्री) तर ईशान खट्टर यांना बियोंड द क्लाउड्स (२०१८) साठी सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष) चा पुरस्कार मिळाला.
अमित शर्मांच्या बधाई हो (२०१८) ने मुख्य पुरस्कारांवर बाजी मारली नसली तरी सहाय्यक अभिनेत्यांच्या पुरस्कारांवर चित्रपटाने आपले नाव नोंदवले. गजराज राव यांना बधाई हो (२०१८) साठी तर विकी कौशल यांना संजू (२०१८) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर दिग्गज अभिनेत्री सुरेखा सिक्री यांनी बधाई हो (२०१८) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्य्क अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. अक्षत घिल्डीयाल यांना बधाई हो (२०१८) साठी सर्वोत्कृष्ट संवाद पुरस्कार मिळाला.
अमर कौशिक यांनी स्त्री (२०१८) साठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शन चा पुरस्कार मिळवला.
राझी मधल्या 'ऐ वतन' साठी गुलझार यांनी सर्वोत्कृष्ट गीतकार आणि अरिजीत सिंह यांनी सर्वोत्कृष्ट गायक (पुरुष) चा पुरस्कार मिळवला.
श्रेया घोषाल यांना पद्मावत मधल्या घुमर गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायक (स्त्री) चा पुरस्कार मिळाला. संजय लीला भन्साळी यांना पद्मावत साठीच सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार मिळाला.
जरी तुंबाड ला क्रिटिक्स अवॉर्ड मध्ये एकही अवॉर्ड पटकावता आला नसला तरी सर्वोत्कृष्ट साउंड डिजाइन (कुणाल शर्मा), सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइन (नितीन चौधरी, राजेश यादव) आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रण (पंकज कुमार) च्या पुरस्कारांवर चित्रपटाने बाजी मारली.
Related topics