मोदी आणि त्यांच्यावर बनलेले चित्रपट चर्चेत असताना उमेश शुक्ल ने सुद्धा आपली मोदी शीर्षक असलेली नवीन वेब-सिरीज पुढच्या महिन्यात रिलीज करण्याचे ठरवले आहे.
महेश ठाकूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिरीज चा पहिला टीजर शनिवारी रिलीज करण्यात आला. महेश ठाकूर मोदींची भूमिका साकारत आहेत तर फैजल खान आणि आशिष शर्मा तरुण मोदींची भूमिका साकारणार आहेत.
पोस्टरवर दिलेली टॅगलाईन 'सामान्य व्यक्तीचा प्रवास' टीजरमध्ये सुद्धा दिसते.
महेश ठाकूर मोदींच्या पेहरावात दिसण्या पलीकडे टीजरमध्ये काही रिव्हील केलेले नाही. ते मोदींपेक्षा तरुण दिसतात तरीही टीजरमध्ये काही संवाद नसल्यामुळे जास्त काही अंदाज बांधता येत नाही.
मिहीर बुट्टा आणि राधिका आनंद या दोघांनी मिळून लिहलेल्या या सिरीजमध्ये नरेंद्र मोदींचा एक सामान्य व्यक्ती ते भारताचे पंतप्रधान हा असामान्य प्रवास दाखवण्यात येणार आहे.
उमेश शुक्ल ने या सिरीजचे दिग्दर्शन केले असून इरॉस नाउ च्या डिजिटल प्लॅटफॉर्म वर ही सिरीज दाखवण्यात येणार आहे.
नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर बनलेला हा दुसरा जीवनपट आहे. ओमंग कुमार दिग्दर्शित आणि विवेक ओबेरॉय यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट पीएम नरेंद्र मोदी ५ एप्रिल ला रिलीज होणार आहे.