प्रसून जोशी यांच्या शब्दांना शशी-ख़ुशी यांच्या संगीताची आणि सुखविंदर सिंह आणि शशी सुमन यांच्या आवाजाची साथ लाभली आहे.
पीएम नरेंद्र मोदी मधील प्रेरणादायी गाणे 'सौगंध मुझे इस मिट्टी की'
मुंबई - 23 Mar 2019 20:27 IST
Updated : 26 Mar 2019 17:26 IST
Mayur Lookhar
१४ फेब्रुवारी ला झालेल्या पुलवामा हमल्यानंतर आणि १३ दिवसांनी भारतीय हवाईदलाने त्याला दिलेल्या चोख प्रत्युत्तरानंतर नरेंद्र मोदी म्हणले होते सौगंध मुझे इस मिट्टी की मै देश नाही मिटने दूंगा.
गीतकार प्रसून जोशी यांनी मोदींचे हेच विधान वापरून ओमंग कुमार यांच्या पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटासाठी गाणे बनवले आहे. हे एक स्फूर्ती आणि प्रेरणा देणारे गाणे आहे.
'सौगंध मुझे इस मिट्टी की' या गाण्यात मोदींना सामना कराव्या लागणाऱ्या संकट आणि त्यावर त्यांनी कशी मात केली हे दाखवले आहे. २००२ गोध्रा हत्याकांड आणि आतंकवाद्यांनी अक्षरधाम देवळावर केलेला हमला या गाण्यात दाखवले आहे.
गोध्रा हत्याकांड हाताळण्यात अनेक त्रुटी झाल्या अशी टीका मोदी आणि त्यांच्या सरकारवर करण्यात आली. गाण्या मध्ये दंगल आणि आतंकवाद हमल्या नंतर मोदींचे रौद्र रूप दाखवले आहे. हे प्रमोशनल गाणे आहे म्हणून ओमंग कुमार यांनी ट्रेलर मधलीच दृश्ये गाण्यात दाखवली आहेत.
प्रसून जोशी यांच्या शब्दांना शशी-ख़ुशी यांच्या संगीताची आणि सुखविंदर सिंह आणि शशी सुमन यांच्या आवाजाची साथ लाभली आहे. सुखविंदर सिंह फार क्वचितच निराश करतात आणि इथे त्यांनी कानसेनांची बिल्कुल निराशा केली नाही. त्यांना साथ लाभली आहे शशी सुमन यांची.
ट्रेलर ला जरी मिक्स रिस्पॉन्स मिळाला असला तरी गाणे चांगले झाले आहे. पीएम नरेंद्र मोदी ५ एप्रिल ला रिलीज होईल. 'सौंगंध मुझे इस मिट्टी की' हे गाणे पहा आणि तुम्हाला हे गाणे कसे वाटले हे आम्हाला खाली संदेश फलकात कळवा.
Related topics
Song review