News Hindi

पीएम नरेन्द्र मोदी ट्रेलर – चौकीदार ते मोठ्या पडद्यावरील हिरो

भारताचे पंतप्रधान आपल्या जीवनपटाच्या ट्रेलर मध्ये हिरोला लाजवतील अशी मोठी मोठी कामे करताना दिसत आहेत.

नवाझुद्दीन सिद्दीकी च्या ठाकरे (२०१९) मध्ये शिवसेनेचे संस्थापक बाळ केशव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या जनतेचे हिरो म्हणून उभे केले होते. पण नरेन्द्र मोदीच्या जीवनपटात त्यांचे पात्र इतके जास्त हेरोईक दाखवले आहे की ते फिल्मी वाटायला लागते. ट्रेलर पाहून तरी तसेच वाटते.

भारतीय जनतेला माहिती आहे की नरेन्द्र मोदी ने अत्यंत गरीब घरातून येऊन पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास केला. पण ट्रेलर मध्ये आपल्याला त्यांची अशी बाजू दिसते जी आपण कधीच पहिली नाही.

ट्रेलरमध्ये नरेन्द्र मोदी पाकिस्तानने दहशतवाद्यांना सहारा दिल्याबद्दल कडक शब्दात त्यांची टीका करत आहेत. ट्रेलरमध्ये दाखवलेली दृश्ये किती खरी किती खोटी याचा अंदाज लावणे मात्र कठीण आहे.

स्वतंत्र भारतातले सर्वात पावरफुल नेत्यां पैकी असलेल्या मोदींचे नाव काही कॉंट्रोव्हर्सी मध्ये सुद्धा घेतले जाते. २००२ गुजरात दंग्यांमुळे दुखी झालेले नरेन्द्र मोदी अश्रू गाळताना दिसतात.

तांत्रिकदृष्ट्या तरी चित्रपट चांगला आहे, पण हेच आपण विवेक ओबेरॉय बद्दल बोलू शकत नाही. विवेक ओबेरॉय वाईट अभिनेते बिल्कुल नाहीत पण ते नरेन्द्र मोदींसारखे दिसत नाहीत.

ओमंग कुमार दिग्दर्शित हा चित्रपट ५ एप्रिल ला रिलीज होईल. खाली ट्रेलर पहा आणि तुम्ही पीएम नरेन्द्र मोदी हा चित्रपट पाहणार का नाही ते आम्हाला कळवा.