News Hindi

अजय देवगण भुज – द प्राईड ऑफ इंडिया मध्ये सैनिकांच्या तुकडीचे प्रमुख विजय कर्णिक यांची भूमिका साकारणार

अभिषेक दुधाइया यांनी चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे.

सध्या अनेक चित्रपटकर्ते भारताच्या युद्धवीरांवर चित्रपट बनवत आहेत अशातच आणखी एका युध्दवीराचा जीवनपट येत आहे. यावेळी अजय देवगण भुज – द प्राईड ऑफ इंडिया मध्ये सैनिकांच्या तुकडीचे प्रमुख विजय कर्णिक यांची भूमिका साकारणार आहेत.

१९७१ साली भारत-पाक युद्धात पाकिस्तानी लष्कराचा निशाण्यावर असलेल्या भुज विमानतळाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी तिथल्या रहिवाश्यांना मदतीला घेऊन खराब झालेली उड्डाणपट्टी ३६ तासात पुन्हा ठीक करून दिली.

अभिषेक दुधाइया चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन करणार आहेत. जीनी खानूजा, वजीर शाह, भूषण कुमार, क्रिशन कुमार आणि दुधाइया हे सर्व मिळून चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

भूषण कुमार यांनी द टाइम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्राला सांगितले, "ही शौर्यगाथा सांगणे आवश्यक आहे जेणेकरून आताच्या आणि पुढच्या पिढीला विजय कर्णिक या धाडसी सैनिकाबद्दल माहिती मिळेल. सामान्य लोकांना आपल्या युद्धनीती मध्ये सामील करण्याचे धाडस त्यांनी दाखवले, तसेच अजय देवगण शिवाय इतर कोणा कलाकाराला निवडण्याचा प्रश्नच येत नाही. दे दे प्यार दे आणि तानाजी – द अनसंग वॉरिअर मध्ये ते आमच्याबरोबर काम करत आहेत. आणि आम्हाला आनंद आहे की ते या चित्रपटात काम करायला तयार झाले."

युद्धवीर विजय कर्णिक यांनी सुद्धा यावर आपले मनोगत व्यक्त केले. "या युद्धामध्ये त्या महिलांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले असते तर ही आमच्यासाठी खूप वाईट गोष्ट असली असती, तरी पण मी त्यांना या मध्ये सामील करण्याचा निर्णय घेतला. हमला झाला तर कुठे लपावे या बद्दल मी त्यांना संपूर्ण माहिती दिली होती आणि त्या महिलांनी देखील दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले. आणि माझ्या नजरेत फक्त अजय देवगणच ही भूमिका साकारू शकले असते त्यामुळे मला आनंद आहे की त्यांनी या चित्रपटाला होकार दिला."

याच विषयावर काही वर्षांपूर्वी लेडीज स्पेशल नावाचे सरिता जोशी यांची प्रमुख भूमिका असलेले एक गुजराती नाटक आले होते. नाटकात गावकरी महिला ज्यांनी मोठ्या धाडसाने गायीच्या शेण आणि चिखल वापरून उड्डाणपट्टी दुरुस्त केली त्यांच्या धाडसावर जास्त भर दिला होता.

भुज व्यतिरिक्त अजय देवगण मराठा सैनिक तानाजी मालुसरे वर बनणाऱ्या तानाजी – द अनसंग वॉरिअर चित्रपटात तानाजीची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट डिसेंबर मध्ये रिलीज होईल. भुज – द प्राईड ऑफ इंडिया ची रिलीज डेट अजून निश्चित नाही.