चित्रपटाची कथा ऐकूनच माझी छाती गर्वाने फुगते, असं अक्षय कुमार म्हणाले. १८९७ साली सारागढी येथे २१ शीख सैनिकांनी दहा हजार अफगाणी सैनिकांना लढा दिला होता. या सत्य घटनेवर केसरी हा चित्रपट आधारित आहे.
या व्हिडिओत अक्षय कुमार आपल्याला केसरी चित्रपटातील दोन महत्वाचे ऍक्शन दृश्ये कशी शूट केली हे सांगत आहेत. त्यातले एक दृश्य स्पिटी घाटामध्ये शूट केले तर दुसरे सातारा जवळ वाई मध्ये.
स्पिटी खूप उंचावर असल्यामुळे कलाकारांना उंचीमुळे येणाऱ्या अडचणींना तोंड देत शूटिंग करावी लागली. १८९७ च्या काळातली पारंपरिक लढाईची स्टाइल शिकायला लागली. अक्षय कुमार ने मान्य केले की ही दृश्ये शूट करणे कठीण होते.
दिग्दर्शक अनुराग सिंह ने सांगितले की त्यावेळी सैनिकांना आपल्या बंदुकीतून एका वेळी फक्त एकच गोळी झाडता येत होती. आणि त्यामुळे शत्रूचा सामना करणे आणखी कठीण होते.
वाई मध्ये शूट करताना त्यांना वेगळ्याच प्रॉब्लेम्स चा सामना करावा लागला. वाईमध्ये रणरणत्या उन्हात पगडी घालून ऍक्शन सीन्स शूट करणे अतिशय कठीण होते.
पण दिग्दर्शक अनुरागच्या मते तिथे क्लायमॅक्स शूट करणे खूपच इंटरेस्टिंग होते. अक्षय कुमार यांनी सुद्धा खुलासा केला की केसरी ची शूटिंग करताना त्यांना खूप मजा आली कारण या चित्रपटासारखी ऍक्शन त्यांनी आधी कधीही केली नव्हती.
हिरु जोहर, अरुण भाटिया, करण जोहर, अपूर्व मेहता, सुनील खेत्रपाल यांची निर्मिती असलेला केसरी २१ मार्च ला रिलीज होईल.