देव पटेल आणि आर्मी हॅमर अभिनयीत हॉटेल मुंबई भारतात नेटफ्लिक्स वर रिलीज होण्याची शक्यता धूसरच आहे कारण प्लस होल्डिंग्स ने चित्रपटाचे भारतीय रिलीज चे हक्क आपल्याकडे असल्याचा दावा करत नेटफ्लिक्स वर केस दाखल केली आहे.
प्लस होल्डिंग्स ने सांगितले की त्यांनी सिंगापूर-ऑस्ट्रेलिया स्थित जाय्टगाय्स्ट एंटरटेनमेंट कडून चित्रपटाचे भारतीय वितरणाचे हक्क विकत घेतले आहेत.
दक्षिण आशिया मध्ये नेटफ्लिक्स हा चित्रपट रिलीज करणार नाही ही बातमी सर्वप्रथम व्हरायटी.कॉम या एंटरटेनमेंट वेबसाइट ने दिली.
प्लस होल्डिंग्स ने आरोप केला आहे की त्यांची डील बेकायदेशीरपणे रद्द करून नेटफ्लिक्स, जाय्टगाय्स्ट, आर्कलाइट फिल्म्स इंटरनॅशनल, फिफ्थ डिमेंशन, हॉटेल मुंबई प्रायव्हेट लिमिटेड आणि इलेक्ट्रिक पिक्चर्स या सर्वांना हक्क विकण्यात आले.
ऑनलाइन रिपोर्टनुसार नेटफ्लिक्स ने भारतात देखील हा चित्रपट रिलीज न करण्याचे ठरवले आहे.
प्लस होल्डिंग्स ने पुन्हा चित्रपटाचे हक्क मिळवण्यासाठी आणि नेटफ्लिक्स ला भारतात चित्रपट रिलीज करण्यापासून रोखण्यासाठी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे.
अँथनी मारस दिग्दर्शित हॉटेल मुंबई २००८ दहशतवादी हल्यावर बेतला आहे. अनुपम खेर आणि जेसन आयझॅक्स यांच्या भूमिका असलेले हॉटेल मुंबई १५ मार्च ला ऑस्ट्रीलिया मध्ये रिलीज होणार असून अमेरिकेमध्ये २९ मार्च ला रिलीज होईल.
गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये नेटफ्लिक्स ने आपल्या भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये या चित्रपटाचा समावेश केलेला.