{ Page-Title / Story-Title }

News Hindi

केसरी मध्ये परिणीती चोपडाने अक्षय कुमार च्या मृत पत्नी ची भूमिका केली आहे

Read in: English | Hindi


त्या म्हणाल्या तुमचा विश्वास बसणार नाही अश्या घटना चित्रपटात घडतात.

Keyur Seta

अनुराग सिंह दिग्दर्शित केसरी चा ट्रेलर पाहून असे वाटत होते की परिणीती चोपडा अक्षय कुमार च्या प्रेयसी ची भूमिका साकारत आहेत, परंतु नुकतेच पत्रकारांशी बोलताना परिणीती ने स्पष्ट केले की त्या अक्षय कुमार च्या मृत पत्नीची भूमिका साकारत आहेत ज्या फक्त फ्लॅशबॅक मध्ये दिसतील.

"नक्कीच हा फक्त पुरुषांचा चित्रपट आहे, पण काही मोक्याच्या क्षणी ईश्वर सिंह (अक्षय कुमार) ला आपल्या पत्नीची आठवण येते. खूप सुंदर प्रेम कहाणी या कथानकात गुंफली आहे."

१८९७ साली सारागढी येथे अफगाणी सैन्याविरुद्ध २१ शीख सैनिक ब्रिटिश आर्मी तर्फे लढले होते. याच घटनेवर हा चित्रपट आधारित आहे.

हिंदी सिनेमात खूपवेळा सत्यघटनेवर आधारित चित्रपटां मध्ये काही न घडलेल्या घटना सुद्धा टाकल्या जातात. परिणीती म्हणाल्या की या चित्रपटात काहीही असत्य नाही.

"केसरी ची विशेष गोष्टच ही आहे की काही घटना पाहताना जरी तुमचा विश्वास बसला नाही तरी त्या सर्व सत्य घटना आहेत. ही शौर्याची अविश्वसनीय गाथा आहे. आपल्या देशात अशी ही लोकं होती यावर आपला विश्वास बसणार नाही."

धर्मा प्रोडक्शन्स निर्मित केसरी २१ मार्च ला रिलीज होईल.

Related topics