News Marathi

एक होतं पाणी टीजर – महाराष्ट्रातल्या पाण्याच्या प्रश्नावर हा चित्रपट प्रकाश टाकतो

एक होतं पाणी भ्रष्टाचारा मुळे तयार झालेली पाणी टंचाईवर आणि कसे फक्त काही श्रीमंतांनाच त्यांना पाहिजे तेवढा पाणीपुरवठा होतो यावर प्रकाश टाकतो.

पाणीटंचाई हा फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला भेडसावणारा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या दुष्काळावर अनेक वेळा बातम्या आल्या आहेत. त्यामुळे पाणीटंचाई सारख्या गंभीर विषयावर मराठीत चित्रपट बनवला जातोय यात काही नवल नाही.

रोहन सातघरे दिग्दर्शित एक होतं पाणी हा चित्रपट महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे यावर भाष्य करतो.

नुकत्याच रिलीज झालेल्या टीजरमध्ये आपल्याला अनेकजण पाण्याच्या एकेक थेंबासाठी जीवाचा आटापिटा करताना दिसतात. पाण्या अभावी एक मुलीचा जीवसुद्धा जातो. आणि तहानेने व्याकुळ मुले घाण पाणी पीत आहेत ही दृश्ये आपले मन हेलावून टाकतात.

एक होतं पाणी या पाणीटंचाई ला कारणीभूत असलेल्या भ्रष्टाचारावर सुद्धा प्रकाश टाकतो. फक्त श्रीमंतांनाच कसे पाण्याच्या टँकर्स मधून पाणी पुरवले जाते हे सुद्धा चित्रपटात दाखवले आहे.

हंसराज जगताप ला २०१४ मध्ये हलाल या चित्रपटातील त्याच्या अभिनयासाठी ज्युरी चा स्पेशल राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात तो आता तरुण व्यक्तीची भूमिका साकारत आहे. त्याचे पात्र श्रीया मास्टेकर साकारत असलेल्या पात्राच्या प्रेमात आहे.

चित्रपटात अनंत जोग खलनायकाच्या भूमिकेत आहेत. यतीन कार्येकर यांची सुद्धा भूमिका आहे.

दिग्दर्शक सातघरे यांचा या अगोदर रिलीज झालेला चित्रपट होता द शॅडो (२०१५). त्यांनी तृषा, लव्ह इज वाट, आणि आकठ कहानी यां सारखे चित्रपट सुद्धा दिग्दर्शित केले आहेत. पण या पैकी कोणताच चित्रपट अजून रिलीज झाला नाही.