{ Page-Title / Story-Title }

News Marathi

पॉंडिचेरी पोस्टर – आयफोन वर शूट होणाऱ्या या चित्रपटात वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर यांचा भावनिक बंध

Read in: English


सचिन कुंडलकर दिग्दर्शित या चित्रपटात सई ताम्हणकर सुद्धा महत्वाच्या भूमिकेत आहेत. पूर्ण पणे आयफोन वर शूट होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट.

Keyur Seta

दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा पॉंडिचेरी हा पूर्ण पणे आयफोन वर शूट होणारा पहिलाच मराठी चित्रपट आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर या प्रमुख कलाकारां बरोबर नीना कुलकर्णी, महेश मांजरेकर, तन्मय कुलकर्णी या सारख्या तगड्या कलाकारांची साथ आहे.

चित्रपटाचे पोस्टर एकदम फ्रेश आणि रंगीबेरंगी आहे. पोस्टर मध्ये आपल्याला तत्ववादी, खानविलकर आणि एक बालकलाकार दिसत आहेत.

पोस्टर वरून असे वाटते की या दोन पात्रां मध्ये एक स्ट्रॉंग इमोशनल बॉण्ड आहे. परंतु पोस्टर वरून त्या दोघां मधले नाते काय आहे याचा अंदाज लागत नाही.

दक्षिण भारतातल्या पॉंडिचेरी या केंद्र शासित प्रदेशा वरून चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले आहे. फ्रेंच संस्कृतीचा प्रभाव असलेल्या या प्रदेशातली घरे सुद्धा त्यांच्या सारखीच म्हणजे पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाची घरे दिसत आहेत. आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल की कथानका मध्ये नक्की या प्रदेशाचा वापर कसा केला आहे.

कुंडलकर आपल्या चित्रपटात आधुनिकतेचा आणि परंपरेचा योग्य समतोल राखतात. पोस्टर वरून हा चित्रपट सुद्धा याच वळणाचा आहे असे वाटते.

त्यांचा या पूर्वीचा चित्रपट गुलाबजाम (२०१८), ज्यात सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर प्रमुख भूमिकेत होते, त्याला सुद्धा परीक्षकांची आणि प्रेक्षकांची सुद्धा पसंती मिळाली होती.

त्यांचे इतर काही नावाजलेले चित्रपट म्हणजे गंध (२००९), हॅपी जर्नी (२०१४), राजवाडे अँड सन्स (२०१५) आणि वजनदार (२०१६).

Related topics

Poster review