भारतीय मनोवैज्ञानिक संघटनेने मेंटल है क्या शीर्षकावर आक्षेप नोंदवला होता.
कंगना रनौतच्या मेंटल है क्या चे शीर्षक बदलून जजमेंटल है क्या करण्यात आले आहे
मुंबई - 29 Jun 2019 10:39 IST
Updated : 01 Jul 2019 21:36 IST
Our Correspondent
कंगना रनौत यांच्या मेंटल है क्या चित्रपटाचे नवीन शीर्षक असेल जजमेंटल है क्या. राजकुमार राव यांची सूद्धा चित्रपटात महत्त्वाची भुमिका आहे.
नवीन शीर्षकासह २६ जुलैला चित्रपट रिलीज होइल. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन च्या सदस्यांना भेटल्या नंतर रनौत यांनी शीर्षक बदलल्याची माहिती दिली.
बालाजी टेलीफिल्म्स च्या प्रवक्त्याने सांगितले की मानसिक आरोग्य हा खूप संवेदनशील विषय असल्याने आम्ही चित्रपटाचे शीर्षक बदलून जजमेंटल है क्या असे ठेवले.
"रनौत आणि राजकुमार राव दोघांनीही या थरारपटामध्ये उत्क्रष्ट काम केले आहे. सी बी एफ सी ने अगदी मोजकेच बदल सुचवत चित्रपटाला यु/ए सर्टिफिकेट दिले आहे," असे ते पुढे म्हणाले.
एप्रिलमध्ये भारतीय मनोवैज्ञानिक संघटना आणि भारतीय मेडिकल असोसिएशनने प्रकाश कोवेलामुडी दिग्दर्शित या चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप नोंदवला. या शीर्षकामुळे मानसिक रोगांविषयी समाजात नकारात्मक भावना पसरेल असे त्यांचे म्हणने होते.
निर्मात्यांनी त्यावेळी म्हटले होते की "आम्ही या चित्रपटातून लोकांना आपआपली वयैक्तित्तता आणि वेगळेपण जपण्याचा संदेश दिला आहे."
जजमेंटल है क्या च्या रिलीजची तारीख २९ मार्च वरून २१ जून करण्यात आली होती, परंतु आता तीही तारीख बदलून २६ जुलैला चित्रपट रिलीज करण्याचे ठरवले आहे.
ह्रतिक रोशन यांचा गणितज्ञ आनंद कुमार वर आधारित जीवनपट सुपर ३० सुद्धा अगोदर २१ जूनला रिलीज होणार होता, परंतु आता तो १२ जुलै ला रिलीज होइल.
Related topics