{ Page-Title / Story-Title }

News Marathi

स्माईल प्लिज ट्रेलर: ललित प्रभाकर मुक्ताचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार.

Read in: English


डिझायनर-दिग्दर्शक विक्रम फडणीस यांचा हृदयांतर नंतर दिग्दर्शक म्हणून हा दुसरा चित्रपट आहे.

Keyur Seta

शेवटी आपल्याला स्माईल प्लिज चित्रपटाचा विषय आता कळला आहे. हा सायकोलॉजिकल ड्रामा असेल का याबद्दल शंका असताना चित्रपटाच्या ट्रेलरवरून आपल्याला आता कल्पना आली आहे की ही एका व्यक्तीची कथा आहे जी अनोळखी लोकांना जीवनाचे सत्व समजवून सांगते.

नंदिनी ही फोटोग्राफर असून ती आपल्या वडील (सतीश आळेकर) आणि मुलीसोबत मुंबईत राहते. एक दिवस त्यांचा दूरचा नातेवाईक विराज (ललित प्रभाकर) त्यांच्याकडे काही दिवसांसाठी राहायला येतो.

सुरुवातीला त्यांचं एकमेकांशी पटत नाही, पण नंतर हळूहळू विराज सर्वांना आवडू लागतो. खासकरून नंदिनीला तो काही जीवनावश्यक उपदेश देतो.

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये या आशयाचे अनेक चित्रपट आपण पहिले आहेत. ऋषिकेश मुखर्जींचा आनंद (१९७०), राजकुमार हिरानींची मुन्नाभाई सिरीज आणि थ्री इडीयट्स (२००९), शाह रुख खान अभिनित कल हो ना हो (२००३) ही त्याचीच काही उदाहरणे.

मराठी चित्रपटसृष्टीत मात्र या आशयाचे चित्रपट आलेले नाहीत. ट्रेलरमुळे चित्रपटाविषयी सकारात्मकता निर्माण होते. चित्रपटात काही हलक्याफुलक्या विनोदी दृष्यांसोबत इमोशनल सीन्स सुद्धा पाहायला मिळतील असे ट्रेलर पाहून वाटत.

प्रभाकर आणि मुक्ता बर्वे दोघांनीही चांगला अभिनय केला असेल असं ट्रेलर पाहून तरी वाटतं. चित्रपटात प्रसाद ओकसुद्धा महत्वाच्या भूमिकेत आहेत. १९ जुलै ला स्माईल प्लिज चित्रपटगृहांमध्ये रिलीज होईल.

Related topics

Trailer review