{ Page-Title / Story-Title }

News Marathi

संजय दत्त यांनी आपली पहिली मराठी निर्मिती बाबा वडील सुनील दत्त यांना समर्पित केली

Read in: English


अभिनेता दीपक डोब्रियाल यांचा हा पहिला मराठी चित्रपट आहे.

Keyur Seta

संजय दत्त यांनी मराठी चित्रपटसृष्टीत चित्रपट निर्माता म्हणून एंट्री केली आहे. राज गुप्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनाची सूत्रं हाथी घेतली असून अभिनेता दीपक डोब्रियाल प्रथमच मराठी चित्रपटामध्ये अभिनय करताना दिसतील.

संजय दत्त यांनी आपले वडील आणि दिग्गज अभिनेते सुनील दत्त यांना हा चित्रपट समर्पित केला. सोशल मीडियावर त्यांनी चित्रपटाचा मोशन पोस्टर रिलीज केला. "माझा पहिला मराठी चित्रपट बाबा सर्व संकटांमध्ये माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिलेल्या माझ्या वडिलांना मी समर्पित करत आहे." योगायोगाची गोष्ट म्हणजे संजय दत्त यांचे टोपणनाव सुद्धा बाबा आहे.

संजय दत्त यांची पत्नी मान्यता दत्त यांनी सुद्धा सोशल मीडियावर मोशन पोस्टर शेअर केला. "आम्ही आमचा पहिला मराठी चित्रपट बाबा सुनील दत्त यांना समर्पित करत आहोत."

मोशन पोस्टर मध्ये आपल्याला एक मुलगा सायकलच्या मागे बसलाय तर त्याचे वडील सायकल चालवताना दिसतात. माऊथ ऑर्गन वर वाजवलेले संगीत सुद्धा छान आहे. मोशन पोस्टर पाहता हा थोडा विनोदी आणि हलकाफुलका चित्रपट असेल असे वाटते.

दिग्दर्शक गुप्ता यांनी तन्नू वेड्स मन्नू (२०११), डी-डे (२०१३), मॅरी कॉम (२०१४) आणि बकेट लिस्ट (२०१८) चित्रपटांवर सहाय्य्क दिग्दर्शक आणि स्क्रिप्ट सुपरवायजर म्हणून काम केले आहे.

Related topics

Poster review