{ Page-Title / Story-Title }

News Marathi

गर्लफ्रेंड ट्रेलर – अमेय वाघ यांचे गर्लफ्रेंड मिळवण्याचे स्वप्न सई ताम्हणकर मुळे पूर्ण होते

Read in: English


गर्लफ्रेंड हा फक्त एक विनोदी चित्रपट नाही.

Keyur Seta

नचिकेत (अमेय वाघ) हुशार विद्यार्थी आहे तसेच त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली आहे, पण तो खुश नाही. त्याला आतापर्यंत एकपण गर्लफ्रेंड नाही या मुळे तो खूप दुखी आहे. त्याच्या आजूबाजूच्या लोकांना वाटू लागते की नचिकेत गे आहे.

या अगोदरच्या टीजर्स मध्ये नचिकेतच्या आयुष्यात सई ताम्हणकर यांच्या पात्राचे महत्व काय असेल ते दाखवले होते आणि आता ट्रेलर मध्ये यावर अधिक उजेड टाकला आहे.

एक दिवस ती अचानक नचिकेतच्या आयुष्यात येते पण त्यामुळे काही नवीन प्रॉब्लेमला सुद्धा त्याला सामोरे जावे लागते. जरी ट्रेलरमध्ये दाखवले नसले तरी त्यांच्या वयातील फरक हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल असं वाटते.

दोन विरुद्ध स्वभावाचे व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात तेव्हा काय परिस्थिती निर्माण होते हे या चित्रपटात दाखवले आहे. ट्रेलरमध्ये विनोदी आणि मन हळवे करतील अशी सुद्धा काही दृश्ये आहेत.

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांची जोडी वेगळी आहे आणि हीच चित्रपटाची जमेची बाजू आहे. चित्रपटात रसिका सुनील यांची सुद्धा महत्वाची भूमिका आहे.

गर्लफ्रेंड २६ जुलैला रिलीज होईल. ट्रेलर खाली पहा.

Related topics

Trailer review