२ ऑगस्टला रिलीज होणाऱ्या बाबामध्ये नंदिता पाटकर, आर्यन मेखजी, अभिजीत खांडकेकर आणि स्पृहा जोशी यांच्या सुद्धा महत्वाच्या भूमिका आहेत.
बाबा विषयी बोलताना दीपक डोब्रियालने सांगितले – हा माझा पहिला मराठी चित्रपट आहे असं बिलकुल वाटलं नाही
मुंबई - 17 Jul 2019 9:00 IST
Updated : 23:15 IST
Keyur Seta
दीपक डोब्रियाल बाबा चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. राज गुप्ता दिग्दर्शित बाबा ची निर्मिती संजय दत्त प्रोडक्शन्स आणि ब्लु मस्टँग प्रोडक्शन्स ने मिळून केली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. "मला इथे इतकं प्रेम मिळालं की मी मराठीत पहिल्यांदाच काम करतोय असं कधी वाटलं नाही," डोब्रियाल म्हणाले. "सृजनशील आणि कल्पक अशा दुसऱ्या इंडस्ट्रीत काम करायला मिळणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे."
या चित्रपटाच्या त्यांच्या कारकिर्दीतल्या महत्वा विषयी ते म्हणाले, "हा चित्रपट माझा हिंदी इंडस्टीतला १२ वर्षाचा प्रवास इतकाच महत्वाचा आहे. म्हणूनच मी मराठी इंडस्ट्रीचा कायम ऋणी राहीन. जणू हा माझा पुनर्जन्मच आहे."
डोब्रियाल चित्रपटात मूक-बधिर पालकाची भूमिका साकारत आहेत आणि न बोलता फक्त हावभावातून सर्व भावना व्यक्त करणे कठीण होते असे त्यांनी म्हटले.
"संपूर्ण चित्रपट शूट करणे खूप मोठे चॅलेंज होते. सुरुवातीला मला वाटलं मी काही सीन्स करू शकतो पण संपूर्ण चित्रपटभर हे पात्र साकारणं माझ्यासाठी खूपच कठीण होते," डोब्रियाल म्हणाले.
संजय दत्त यांची पहिली चित्रपट निर्मिती आहे बाबा.
Related topics