{ Page-Title / Story-Title }

News Hindi

एक लडकी को देखा तो ऐसा लगा च्या टायटल गाण्याला पंजाबी लोकसंगीताची जोड

Read in: English | Hindi


रोचक कोहलींनी आर डी बर्मन यांचे १९४२ ए लव्ह स्टोरी चित्रपटातील आयकॉनिक गाणे पुनर्निर्मित केले आहे.

Suparna Thombare

आर डी बर्मन यांचे १९४२ – ए लव्ह स्टोरी (१९९४) चित्रपटातील सुप्रसिद्ध आणि आयकॉनिक गाणे 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' पुनर्निर्मित करण्याची कठीण जबाबदारी संगीत दिग्दर्शक रोचक कोहली यांच्यावर होती.

कोहली यांनी या अगोदर 'तेरा यार हूँ मैं' (सोनू के टीटु की स्विटी) आणि 'नैना ना जोडे' (बढाई हो) ही ओरिजिनल गाणी संगीतबद्ध केली आहेत तसेच त्यांनी काही जुनी गाणी पुनर्निर्मित केली आहेत.

त्यांनी काही दिवसांपूर्वीच चीट इंडिया चित्रपटासाठी 'दिल मे हो तुम' हे सत्यमेव जयते (१९८७) ह्या चित्रपटातील गाणे पुनर्निर्मित केले.

हे तर स्पष्टच आहे की कोणीच आर डी बर्मन यांची ट्यून, जावेद अख्तर यांचे शब्द आणि विधू विनोद चोपडा यांचे व्हिज्युअल्स आणि अनिल कपूर व मनीषा कोईराला यांचा अप्रतिम अभिनय यांच्याशी तुलनाच करू शकत नाही.

शेली धर यांच्या ह्या चित्रपटाची कथा पंजाबमध्ये घडते म्हणून कोहलींनी गाण्यात पंजाबी लोकसंगीताचा वापर केला आहे. त्यांनी मुखड्यामध्ये थोडे बदल केले आहेत आणि सितारच्या ऐवजी ह्या गाण्यात गिटारचा वापर केला आहे.

गाण्याचे हे नवीन व्हर्जन नक्कीच वाईट नाही. गाण्यात केलेला पंजाबी लोकसंगीताचा वापर आजच्या पिढीशी सुसंगत वाटतो.

गाण्याचे गीतलेखन मात्र आपली निराशा करते. खूपवेळा शब्द मीटरमध्ये बसतच नाहीत.

कायमची लक्षात राहिलेली ओपनिंग ट्यून वर ह्या वेळी 'अँखियाँ दे कोर रेह जाणे दे केहना है जो केह जाणे दे' हे शब्द बसवले आहेत.

'जैसे' पासून सुरु होणाऱ्या एकामागोमाग सात ओळी आणि त्यानंतर येणारी 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' ह्या मधुर ओळी ह्या नवीन गान्यात्तून काढून टाकल्या आहेत आणि त्याजागी एकदम साधे सरळ 'पहले तो कभी यूँ मुझे ना ऐसे कूछ हुआ, दिवानी लहरोन को जैसे साहिल मिला' असे शब्द वापरले आहेत.

व्हिडिओमध्ये राजकुमार राव आणि सोनम के अहुजा यांच्या नात्याचे काही क्षण पाहायला मिळतात. राजकुमार रावना सोनम कपूरबद्दल वाटणारे प्रेम आणि सोनम कपूरना त्या मुली विषयी वाटणारे प्रेम ह्या गाण्यातून दाखवण्यात आले आहे.

अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आलेल्या त्या मुलीचा रोल रेजीना कसेंड्रा ह्या अभिनेत्री साकारात आहेत.

गाण्यामध्ये अनिल कपूर आणि जुही चावला यांच्यातले काही प्रेमळ प्रसंग सुद्धा आहेत.

एक लडकी को देखा तो ऐसा लगा १ फेब्रुवारी ला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. गाणे खाली पहा.

 

Related topics

Song review