निर्मात्यांनी नुकतेच चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे.
संदीप कुलकर्णी आणि राजेश्वरी सचदेव यांची प्रमुख भूमिका असलेला डोंबिवली रिटर्न २२ फेब्रुवारी ला रिलीज होणार
Mumbai - 07 Jan 2019 17:00 IST
Updated : 10 Jan 2019 1:38 IST
Suparna Thombare
निर्मात्यांनी आज महेंद्र तेरेदेसाई दिग्दर्शित डोंबिवली रिटर्न चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज केले.
पोस्टरवर राजेश्वरी सचदेव आणि संदीप कुलकर्णी दिसत आहेत, जे पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र काम करत आहेत.
डोंबिवली रिटर्न द्विभाषिक चित्रपट असून तो हिंदी आणि मराठी अश्या दोन भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
डोंबिवली फास्ट (२००५) ह्या चित्रपटाशी तुलनेबाबत दिगदर्शक महेंद्र तेरेदेसाई म्हणाले की दोन्ही चित्रपटांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. सेम नावामुळे लोकांना असे वाटते की हा डोंबिवली फास्ट चा सिक्वेल आहे पण तसे काही नाही.
"चित्रपटासाठी मला डोंबिवली रिटर्न पेक्षा योग्य टायटल सुचू शकले नाही. डोंबिवली फास्ट शी जर माझ्या चित्रपटाची तुलना होणार असेल तर मला याचा आनंदच आहे. चांगल्या चित्रपटाशी तुलना होणे कधीही चांगलेच."
कुलकर्णी आणि सचदेव एका विवाहित जोड्याच्या भूमिकेत दिसत आहेत. सोबतीला पोस्टरवर त्यांची मुलगी सुद्धा आहे. पोस्टरमध्ये तिघेही वर्तुळाकार रेल्वे ट्रॅक्स च्या मधोमध उभे आहेत आणि कॅमेराकडे पाहत आहेत.
जे जातं तेच परत येतं? ही पोस्टरवर असलेली चित्रपटाची टॅगलाईन नक्कीच आपली उत्सुकता वाढवते. पोस्टर आणि टॅगलाईन वरून तरी हा एक थरारपट आहे असे वाटते.
चित्रपटाच्या विषयाबद्दल बोलताना तेरेदेसाई म्हणाले की "जगात साऱ्या वाईट गोष्टी घडण्यामागे पैसाच कारणीभूत असतो ही धारणा मध्यम वर्गातील कुटुंब च्या मनात किती खोलवर रुजलेय हे या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एकदा मुलुंड ते सी एस टी प्रवास करताना मला ही कथा सुचली होती.
"संदीप कुलकर्णींना ही कथा खूपच आवडली. ते फक्त उत्तम अभिनेतेच नाहीत तर उत्तम निर्माते सुद्धा आहेत. आम्ही कॉलेजपासून मित्र आहोत. आम्ही एकत्र नाटकं केली आहेत. मी संदीप कुलकर्णींनी निर्मिती केलेल्या पहिल्या चित्रपटाचे संवाददेखील लिहले होते."
पोस्टर बरोबर निर्मात्यांनी २२ फेब्रुवारी ला चित्रपट रिलीज होईल हे घोषित केले. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद सारे काही तेरेदेसाई यांनीच केले आहे. डोंबिवली रिटर्न हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिलाच चित्रपट आहे.
कुलकर्णी आणि सचदेव यांच्याव्यतिरिक्त टीवीएफ च्या ट्रीपलिंग ह्या वेबसिरीज मूळे प्रसिद्ध झालेले अभिनेते अमोल पराशर यांची सुद्धा चित्रपटात महत्वाची भूमिका आहे.
संदीप कुलकर्णी यांनी महेंद्र अटोळे यांच्याबरोबर उभारलेल्या करंबोळा क्रिएशन बॅनर्स खाली ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ह्या बॅनरखाली बनणारा हा पहिलाच चित्रपट आहे.
Related topics