News Hindi

बर्लिन चित्रपट महोत्सवात हॉलिवूड रिपोर्टर या मॅगझीनने सान्या मल्होत्राला 'टॅलेंट टू वॉच' म्हटले

सान्या मल्होत्राची भूमिका असलेला रितेश बत्रा दिग्दर्शित फोटोग्राफ हा चित्रपट १३ फेब्रुवारीला जर्मन चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे.

शटरबग्स इमेज

सान्या मल्होत्राची कारकीर्द सध्या भरारी घेत आहे. समीक्षकांनी नावाजलेल्या पठाखा (२०१८) या चित्रपटानंतर बधाई हो (२०१८) या सुपरहिट चित्रपटात काम केल्यानंतर आता हॉलिवूड रिपोर्टर या मॅगझीनने त्यांच्या नावाचा ५ उत्कृष्ट टॅलेंट टू वॉच या नवाजलेल्या यादीमध्ये समावेश केला आहे.

मल्होत्रा अभिनयित फोटोग्राफ चित्रपटाचा २७ जानेवारीला संडान्स चित्रपट महोत्सवात प्रीमियर झाला. भारतात ८ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या फोटोग्राफचे वितरण अमेझॉन स्टुडिओज करणार आहे.

हॉलिवूड रिपोर्टरने त्यांच्या समीक्षणामध्ये म्हटले, "रितेश बत्रा त्यांच्या पटकथेतून जरी मिलोनीच द्विधा मनस्थिती दाखवण्यात पूर्णपणे यशस्वी झाले नसले तरी सान्या मल्होत्राने स्वतःच अस्तित्व हरवत चाललेल्या मिलोणीची नस अगदी करेक्ट पकडली आहे."

आणि आता बर्लिन चित्रपट महोत्सवाला सुरुवात होण्याआधी हॉलिवूड रिपोर्टर मॅगझीनने सान्या मल्होत्रा बरोबर जोनस डसलेर, ऐंजेलिकी पापोलिआ, ऍना निओस्की आणि स्लिक वूड्स यांना 'टॅलेंट टू वॉच' ने संबोधले.

फोटोग्राफ मध्ये नवाझुद्दीन सिद्दिक्कीची सुद्धा प्रमुख भूमिका आहे.

जर्मन चित्रपट महोत्सवाच्या स्पेशल गाला या विभागात हा चित्रपट दाखवला जाणार आहे.

चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांनी मॅगझीनच्या ऑनलाइन संस्करणमध्ये आलेली हे गौरवास्पद बातमी लोकांसमोर आणली.

२६ वर्षाची भारतीय अभिनेत्री सान्या मल्होत्राने २०१८ मध्ये बधाई हो आणि पटाखा चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयाने सर्व भारतीयांची मने जिंकली.

आणि आता लंचबॉक्सचे दिग्दर्शक रितेश बत्राच्या नवीन चित्रपट फोटोग्राफ मध्ये एका स्ट्रीट फोटोग्राफरची मंगेतर असण्याचं नाटक करावं लागलेल्या अबोल मुलीची साकारलेली ही भूमिका त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीचे दरवाजे उघडू शकते.

मल्होत्रा आणि फातिमा शेख दंगल (२०१६) नंतर अनुराग बसूच्या अँथॉलॉजी चित्रपटामधून पुन्हा एकत्र दिसणार आहेत.