पाश्चिमात्य देशांमध्ये जशी रॅपची सुरुवात झाली अगदी तशीच गल्लीबोळातून वेगवेगळ्या संकटाना सामोरे जात मुंबईत रॅपचा जन्म झाला. त्यामुळे गली बॉय (२०१९) मधील 'मेरे गली मे' या अँथम गाण्यातून मुंबई १७ (धारावी) च्या छोट्या छोट्या गल्लीबोळांचे दर्शन होणे हे साहजिकच आहे.
डिव्हाइन आणि नेझी यांचे याच नावाचे २०१६ मधले सुपरहिट गाण्याचे हे अपग्रेडेड व्हर्जन आहे. गाण्यातल्या ऍटिट्यूड मुळे आणि त्यात मांडलेल्या कटू सत्यामुळे हे एक अँथम गाणे म्हणून नक्कीच शोभते.
रणवीर सिंग हे स्वतःच एक एनर्जीचा स्रोत आहेत आणि या गाण्यासाठी त्यांनी स्ट्रीट रॅपरच्या भूमिकेत कमालच केली आहे.
छायाचित्रकार जय ओझा यांनी त्यांच्या कॅमेराच्या करामतींमुळे रणवीर सिंग यांचा या गाण्यातला ऍटिट्यूड आणखीनच उठून दिसतो. अक्टर्सचा प्रयत्न स्तुत्य आहेच परंतू खऱ्या स्तुतीचे हकदार आहेत व्हिडिओमध्ये दिसणारी खऱ्या खुऱ्या लोकांची गर्दी.
गल्लीबोळात जाऊन मुंबईतल्या लोकांचे जीवन दाखवल्या मुळे प्रसिद्ध झालेल्या ओरिजिनल व्हिडिओशी प्रामाणीक राहण्याचा प्रयत्न या गाण्यात केला गेला आहे. कॅमेरा जमलेल्या गर्दीमध्ये रॅपर्स मागे फिरत असतो. ती गल्लीमधली धूळ, गर्दी आणि लोकांचा उत्साह पाहून आपण पण उत्साहित होतो.
ओरिजिनल रॅप मधला आशय, रॅपची स्पीड आणि शब्दांवर असलेली पकड यामुळे आधीच ते गाणे सुपरहिट झाले होते. चित्रपटासाठी डिव्हाइन आणि नेझी यांनी त्यांच्या गाण्याची गती वाढवली आहे.
अँथम गाणे म्हणून अगदी योग्य असलेल्या या गाण्यात झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांचे आयुष्य कसे असते हे दाखवले आहे. सिद्धांत चतुर्वेदी आणि रणवीर सिंग यांनी ओरिजिनल गाण्यातली एनर्जी आणि स्वैगला योग्य न्याय दिला आहे.
बीट्स (सेज) आणि पर्कशनचा वापर करून गाण्याची गती थोडी वाढवली आहे. गाण्यातले पर्कशन ऐकून तुम्हालाही रॅप करायची इच्छा होईल.
गलीबॉयचे संगीत उत्कृष्ट झाले आहे असे हे गाणे ऐकून तरी वाटते. खाली ओरिजिनल गाणे देखील पहा.