दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी त्यांच्या ४० वर्षांच्या अभिनय कारकिर्दीमध्ये नाटक, टेलिव्हिजन, हिंदी आणि मराठी सिनेमामध्ये विविध भूमिका केल्या आहेत. टीव्ही शो चिमणराव गुंड्याभाऊ असो किंवा नाटकांमधली वासूची सासू असो, प्रभावळकर चेहऱ्यावरचे निरागस हावभावांचा अत्यंत खुबीने वापर करून जी काही विनोदनिर्मिती करतात त्यात त्यांचा कोणीच हात धरू शकत नाही.
प्रभावळकर म्हणाले की जगभरातल्या विनोदी कलाकार आणि विविध विनोदीशैलींचा त्यांच्यावर प्रभाव आहे. "माझ्यावर पु ल देशपांडेंचा देखील प्रभाव आहे, त्यांची विनोदाची एक वेगळी शैली आहे, ते त्यांच्या परफॉर्मन्स मध्ये कित्येकदा स्वतःचा मजाक उडवतात.
यस प्राइम मिनिस्टर अश्या डार्क ब्रिटिश ह्युमर पासून अगदी मिस्टर बीन सारख्या स्लॅपस्टिक ह्युमरपर्यंत असे विनोदाचे सर्व प्रकार त्यांना आवडतात. "अगदी वूडी आलन आणि पीटर सेलर्स यांचं ह्युमर सुद्धा मला आवडतं. परंतु वयक्तिक रित्या मला पोकर फेस पद्धतीचे ह्युमर खूप आवडते. नवीन पिढीमध्ये भाऊ कदम हे त्यातले एक अभिनेते आहेत, ते स्ट्रेट फेस ठेवून कॉमेडी करतात."
प्रभावळकरांनी पुढे लगे रहो मुन्ना भाई (२००६) मध्ये राजू हिराणींनी गांधींची भूमिका कशी लिहली होती यावर सविस्तर चर्चा केली.
प्रभावळकरना लगे राहो मुन्ना भाई मधील गांधींच्या भूमिकेसाठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. बोमन इराणींनी जेव्हा सर्वप्रथम त्यांना गांधींच्या वेशात पहिले तेव्हा त्यांची काय रिअक्शन होती हेसुद्धा प्रभावळकरांनी प्रेक्षकांना सांगितले.
"मला ही भूमिका मी निभावू शकेन का नाही याची खात्री नव्हती. एकदा बोमन इराणी सेट वर उपस्थित होते, त्यांचे त्यादिवशी शूट होणार नव्हते, म्हणून ते फक्त शूटिंग पाहायला आलेले आणि त्याचवेळी त्यांनी मला गांधींच्या वेशात सर्वप्रथम पहिले. तेव्हा ते म्हणाले की माझं ट्रान्सफॉर्मशन इतकं अविश्वसनीय आहे कि ते मला ओळखूच शकले नाहीत. त्यामुळे मला आत्मविश्वास मिळाला की मी कमीतकमी गांधींसारखा दिसण्यात तरी यशस्वी झालोय."
गांधींच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य आणि तो प्रेमळ भाव सतत चेहऱ्यावर ठेवण्यात मला खूप कठीण जात होते, असेही त्यांनी सांगितले. "मेकअपला अडीच तास लागत असत. माझ्या चेहऱ्यावर आर्टिफिशिअल नाक आणि कान चिकटवले जात, त्वचेवर खोट्या सुरकुत्या देखील दाखवायच्या होत्या, त्यामळे मला त्रासदेखील व्हायचा परंतु तरीही मला गांधींसारखे चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवावे लगे."
त्यांनी शूटिंगच्या सुरुवातीच्या काही दिवसातला एक किस्सा सांगितला. "मी व्हॅनिटी व्यान मध्ये बसून चिकन खात होतो, माझ्यासमोरच एक भला मोठा आरसा होता. मी जेव्हा स्वतःला गांधींच्या वेशात चिकन खाताना आरश्यात पहिले त्यावेळी मला फारच विचित्र वाटले, म्हणून मी त्याचवेळी ठरवले की जोपर्यंत शूटिंग संपणार नाही तोपर्यंत मी मांसाहार करणार नाही."
प्रभावळकरांनी सांगितले की सुरुवातीला ते सेकण्ड इनिंग्स ओल्ड एज होम मधील एका वृद्धाची भूमिका करणार होते, परंतु राजू हिरानींना भेटल्यावर हिरानी म्हणाले की आपण एकदा गांधींच्या भूमिकेसाठी ट्राय करून पाहूया.
"मी थोडा चकितच झालो कारण जरी मी अंगकाठीने बारीक असलो तरी मी खूप उंच आहे आणि माझा चेहरा गांधींच्या चेहराशी अजिबात मेळ खात नाही. मेकअप आर्टिस्ट विद्याधर भाटे यांनी तीन तास माझा मेकअप केला आणि राजू हिराणींनी मला हॅंडीकॅम वरच शूट केलं.
"२-३ दिवसांनी हिराणींचा फोने आला की [निर्माते] विधू विनोद चोप्डाला तुम्ही आवडला, ते म्हणाले माझ्या चेहऱ्यावर लहान मुलांसारखे निरागस हास्य आहे. शेवटी माझ्या निरागस हास्यामुळे मला ती भूमिका मिळाली," असं विनोदाने ते म्हणाले.