कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाबरा दिग्दर्शित २०१४ मधील रोमँटिक हॉलिवूड चित्रपट द फॉल्ट इन अवर स्टार्स चा हिंदी रीमेक असलेल्या चित्रपटाचे नाव बदलून आता दिल बेचारा असे ठेवण्यात आले आहे.
या पूर्वी चित्रपटाचे नाव किझी और मैनी असे होते. मुकेश छाबरा यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. सुशांत सिंग राजपुत आणि संजना सांघी यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
हा चित्रपट एंसेल एलगोर्ट आणि शेलीना वूडली यांच्या प्रमुख भूमिका असलेला आणि द फॉल्ट इन यावर स्टार्स नावाच्या पुस्तकावर बनलेल्या हॉलीवुड चित्रपटाचा अधिकृत रीमेक आहे.
जॉन ग्रीन हे या पुस्तकाचे लेखक आहेत. जोश बून यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची कथा कॅन्सरग्रस्त हॅझेल आणि पायाने अधु अगस्टस च्या लव्ह स्टोरी भोवती फिरते.
या रीमेक ला ए आर रहमान संगीत देणार असून सैफ अली खान सुद्धा सहाय्यक भूमिकेत दिसतील. खान कदाचित पीटर वॅन हौटेन ही भूमिका करत आहेत. ओरिजिनल चित्रपटात ही भूमिका विलेम डॅफो या अभिनेत्याने साकारली होती.
मुकेश छाबरा वर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना चौकशी पूर्ण होई पर्यंत फॉक्स स्टुडिओज ने सस्पेंड केले होते. पण आता चौकशी समिती कडून क्लीन चिट मिळाल्यामुळे त्यांनी चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केली आहे.
वर्षाअखेरीपर्यंत दिल बेचारा रिलीज होईल.