भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या अनुराग कश्यप दिग्दर्शित चित्रपटाचे शीर्षक 'वुमनिया' प्रीतिश नंदी कम्युनिकेशन यांनी आपल्या नावे रजिस्टर केले आहे.
हे शीर्षक नक्की कुणाचे? वुमनिया या शीर्षकासाठी अनुराग कश्यप, प्रीतिश नंदी यांच्यामध्ये वाद सुरु
Mumbai - 07 Feb 2019 10:48 IST
Updated : 08 Feb 2019 4:55 IST
Our Correspondent
वुमनिया या शीर्षकासाठी अनुराग कश्यप आणि निर्माते प्रीतिश नंदी यांच्यामध्ये वाद सुरु आहे.
वयाची साठी पार केल्यानंतर नेमबाजीमध्ये राष्ट्रीय स्तरावर पदक पटकावणाऱ्या दोन स्त्रिया चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर यांच्या आयुष्यवर वुमनिया चित्रपट आधारित आहे.
अनुराग कश्यप यांच्या गँग्स ऑफ वासेपूर (२०१२) चित्रपटातील एका गाण्यावरून हे शीर्षक घेण्यात आले आहे.
परंतु प्रीतिश नंदी कम्युनिकेशन्स यांनी अगोदरच हे शीर्षक त्यांच्या नावावर रजिस्टर केले आहे, आणि त्यामुळेच या दोघांमध्ये वाद निर्माण झाला आहे.
मुंबई मिरर वृत्तपत्राशी बोलताना कश्यप म्हणाले, "हे शीर्षक आम्हाला वापरू द्यावे असे आम्ही नंदीकडे विनम्र निवेदन केले आहे, तसेच या मुद्यावर आमची वकिलांशी सुद्धा चर्चा झाली आहे."
ते पुढे म्हणाले, "जो शब्द आम्हीच बनवला आणि वापरात आणला, आता त्याच शब्दाच्या हक्कासाठी आम्हाला भांडावं लागतंय."
१० फेब्रुवारीपासून चित्रपटाच्या शूटला सुरुवात होईल. पण सेन्सरचे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी निर्मात्यांना शीर्षक रजिस्टर करावे लागेल.
याअगोदर गेल्या आठवड्यात अनुराग कश्यपने चित्रपटाचे शीर्षक वुमनियाच आहे का यावर बोलण्याचे टाळले. कदाचित हे शीर्षक सध्या वापरण्यास उपलब्ध नसल्याने त्यांनी बोलण्याचे टाळले असावे.
रिपोर्ट मध्ये प्रीतिश नंदींचे सुद्धा विधान होते. ते म्हणाले, "वुमनिया हे शीर्षक प्रीतिश नंदी कम्युनिकेशन च्या नावावर रजिस्टर आहे. आम्ही आय एम पी पी ए कडे हे शीर्षक रजिस्टर केले आहे."
रिपोर्टमध्ये असा सुद्धा उल्लेख होता की नंदी यांनी अनेक वेळा लेखी स्वरूपात अनुराग कश्यप यांना शीर्षक वापरण्यास मनाई केली आहे.
Related topics