{ Page-Title / Story-Title }

News Hindi

या ऍक्शनने भरपूर जंगली विडिओ मध्ये विद्युत जमवाल बनलेत जंगलातील रहिवासी

Read in: English | Hindi


द मास्क (१९९४) आणि स्कॉर्पियन किंग (२००२) सारख्या हॉलीवूडपटांचे दिग्दर्शन करणारे चक रसेल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

Keyur Seta

अभिनेता विद्युत जमवाल पुन्हा एकदा आपल्या समोर असे ऍक्शन सीन्स घेऊन आले आहेत जे फक्त तेच निभावू शकतात. कमांडो आणि कमांडो २ सारखे त्यांचे चित्रपट हे त्यांच्या कौशल्याची उदाहरणे आहेत. आणि आता ते जंगली चित्रपटातून पुन्हा आपल्यासमोर प्राण्यांच्या हालचालींची तंतोतंत कॉपी करताना दिसत आहेत.

निर्मात्यांनी विद्युतचा अथक शारीरिक सराव करतानाचा विडिओ प्रसिद्ध केला आहे. ही दृश्ये चित्रपटाचाच भाग असल्यामुळे हा चित्रपटाचा टीजरच आहे असं म्हणायला हरकत नाही.

चाळीस सेकंडच्या या टीजरमध्ये आपल्याला विद्युत जमवाल अतिशय वेगाने मोटारसायकल चालवताना दिसतात. जमवाल ने पाण्यामध्ये केलेला शारीरिक सराव पाहून तुमचे डोळे विस्फारतील.

काही दृश्यांमध्ये ते प्राण्यांची हालचाल हुबेहूब कॉपी करताना दिसत आहेत या दृश्यावरूनच ते जंगलातल्या जीवनाशी एकात्म झाले आहेत हे लक्षात येते.

छायाचित्रकाराने कुशलतेने सर्व दृश्ये छायाचित्रित केली आहेत. पार्श्वसंगीत म्हणून चालू असलेले संस्कृत श्लोकांमुळे विडिओ अजून थरारक झाला आहे.

द मास्क (१९९४) आणि स्कॉर्पियन किंग (२००२) सारख्या हॉलीवूडपटांचे दिग्दर्शन करणारे चक रसेल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. विद्युत जमवाल चे हे ऍक्शन सीन्स पाहून चित्रपटाविषयी कुतूहल अजून वाढले आहे.

ते एका प्राण्यांच्या डॉक्टरची भूमिका साकारत आहेत जो आपल्या वडिलांचे एलिफन्ट रिसर्व (हत्तींसाठी राखीव जागा) सांभाळण्यासाठी परत येतो. अतुल कुलकर्णी आणि मकरंद देशपान्डे यांच्या सुद्धा भूमिका आहेत.

जंगली ५ एप्रिलला रिलीज होणार आहे. ६ मार्च ला चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. चित्रपटाची निर्मिती जंगली पिक्चरर्स ने केली आहे. विडिओ खाली पहा.

Related topics

Teaser review