{ Page-Title / Story-Title }

News Chinese Hindi

श्रीदेवी यांचा शेवटचा चित्रपट मॉम चीनमध्ये २२ मार्च ला रिलीज होणार

Read in: English | Hindi


गेल्या वर्षी २४ फेब्रुवारी ला दुबई मध्ये श्रीदेवींचा अपघाती मृत्यू झाला.

Our Correspondent

या वर्षी चीन मध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट असणार आहे श्रीदेवींचा शेवटचा चित्रपट मॉम (२०१७). दिग्दर्शक रवी उदयवार यांची ही बदल्याची कथा २२ मार्च ला चीनमध्ये रिलीज होणार असून झी स्टुडिओज इंटरनॅशनल या चित्रपटाची प्रस्तुती करणार आहे.

गेल्या वर्षी चीनमध्ये १० भारतीय चित्रपट रिलीज झाले होते. या मध्ये बजरंगी भाईजान (२०१५), सुलतान (२०१६), सिक्रेट सुपरस्टार (२०१७), हिंदी मिडीयम (२०१७), बाहुबली – द कन्क्लुजन (२०१७), टॉयलेट – एक प्रेम कथा (२०१७), हिचकी (२०१७), १०२ नॉट आऊट (२०१८), पैड मॅन (२०१८) आणि थग्स ऑफ हिंदोस्तान (२०१८) या चित्रपटांचा समावेश होता.

मॉम हा श्रीदेवींचा शेवटचा चित्रपट होता. श्रीदेवींचा गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीला दुबई मध्ये बाथटब मध्ये बुडून अपघाती मृत्यू झाला.

त्यांनी चित्रपटात आर्या (सजल अली) च्या सावत्र आईची भूमिका केली होती. आर्याचा तिचे क्लासमेट बलात्कार करतात आणि तिला तसेच मरायला सोडून देतात. एक डिटेक्टिव्ह (नवाझुद्दिन सिद्दीकी) आणि सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन (सीबीआय) अधिकारी (अक्षय खन्ना) च्या मदतीने देवकी (श्रीदेवी) आर्याला न्याय मिळवून देते.

श्रीदेवींना मृत्यूपश्च्यात या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या अभिनय कारकिर्दी मध्ये त्यांना हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे.

Related topics