ट्रेलरमध्ये अनेक गोष्टी रिव्हिल करण्यात आल्या आहेत. कथेमध्ये सुद्धा नावीन्य नाही. कवीश्वर यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे.
आम्ही बेफिकीर ट्रेलर – मैत्री आणि प्रेमाच्या कात्रीमध्ये अडकलेले सुयोग्य गोर्हे आणि मिताली मयेकर
Mumbai - 22 Feb 2019 11:58 IST
Updated : 04 Mar 2019 6:24 IST
Our Correspondent
पहिल्यांदाच दिग्दर्शन करणाऱ्या कवीश्वर मराठे यांच्या आम्ही बेफिकीर या चित्रपटातून मिताली मयेकर पहिल्यांदाच मराठी चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका करणार आहेत.
आम्ही बेफिकीर ही कथा आहे रघु (सुयोग्य गोर्हे) आणि त्याचे मित्र (राहुल पाटील, स्वप्नील काळे, स्वप्नील हाडके, देवरूप शर्मा) यांची. रघु मिताली मयेकरने साकारलेल्या पात्राच्या प्रेमात आहे. ट्रेलरवरून असे वाटते की हा चित्रपट त्यांच्या मैत्री विषयी आहे. चित्रपटात विश्वासघात आणि क्राइमचा अँगल सुद्धा आहे.
ट्रेलर मध्येच खूप गोष्टी रिव्हिल करण्यात आल्या आहेत आणि कथे मध्ये सुद्धा नावीन्य नाही. ट्रेलरला योग्य फ्लो नाही आणि संपूर्ण चित्रपटातच हा प्रॉब्लेम आहे अशी शंका येते.
मयेकर यांनी या अगोदर शाहरुख आणि इरफान खान ची प्रमुख भूमिका असलेला बिल्लू (२००९) आणि उर्फी (२०१५) या दोन चित्रपटात अभिनय केला आहे. पण त्या सोशल मेडिया, खास करून इंस्टाग्राम, वर खूप प्रसिद्ध आहेत.
या वर्षी जानेवारी मध्ये रिलीज झालेल्या कृतांत नंतर सुयोग्य गोर्हेंचा हा दुसराच चित्रपट आहे.
आम्ही बेफिकीर ८ मार्च म्हणजेच महिला दिनी रिलीज होणार आहे, पण ट्रेलरमध्ये महिला दिनाची थट्टा करणारा एक विनोद आहे. ट्रेलर खाली पहा.
Related topics
Trailer review