अभिषेक चौबे दिग्दर्शित चंबलच्या डाकुंवर आधारित सोनचिडीया या चित्रपटात रॅपच्या माध्यमातून विद्रोहाला आवाज द्याचा प्रयत्न केला गेला आहे.
सोनचिडीयाच्या नवीन गाण्या मध्ये गीतकार अभिषेक नैलवाल यांनी 'डाकू अँथम' च्या रॉक स्टाइल रिदम ला मॅच होईल असे शब्द लिहले आहेत.
गाण्यातील दृश्ये ट्रेलर मध्ये दाखवलेल्या दृश्यां सारखीच आहेत, काही दृशे तर अगदी ट्रेलर मधूनच उचलली आहेत. फक्त एकच फरक आहे, तो म्हणजे गाण्यात डाकूंची दरोडा टाकण्या अगोदरची तयारी सुद्धा दाखवली आहे.
जसजसं डाकू आणि पोलीस यांच्यातला युद्ध अधिक घमासान होऊ लागतं तसतसं म्युसिक सुद्धा आणखी इंटेन्स होत जाते. केतन सोढा यांनी गाण्याची सुरुवात इलेक्ट्रिक रिफ ने केली आहे आणि अगदी शेवट पर्यंत आपल्याला त्या रिफ ची तीव्रता जाणवत राहते.
नैलवाल यांच्या स्टॅकॅटो शब्दां मुळे गाण्याला एक वेगळाच रंग मिळाला आहे. पण गाण्याचे शब्द इतकेही चांगले नाहीत की तुमचं लक्ष वेधून घेतील. अर्धे गाणे संपल्या नंतर गाण्यात खरी मजा यायला सुरवात होते, खासकरून जेव्हा गिटार वाजायला सुरुवात होते.
नैलवाल यांचा खर्जातला आवाज या गाण्याच्या स्टाइल ला अगदी चपखल बसतो. पण तुमचं लक्ष सर्वात जास्त वेधून घेतं ते विवेक दयाल यांचं गिटार कौशल्य.
सोनचिडीया १ मार्च ला रिलीज होणार आहे. गाणे खाली पहा आणि तुम्ही हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहात का नाही ते आम्हाला कळवा.