{ Page-Title / Story-Title }

News Hindi

बदला चित्रपटातील 'क्यों रब्बा' गाणे: अमाल मलिकची मेलडी एका स्त्रीची दुविधा दर्शवते

Read in: English | Hindi


अमाल मलिक यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला अरमान मलिक ने आपल्या आवाजाचा साज चढवला आहे.

Shriram Iyengar

दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्या बदला च्या थरारक ट्रेलरने लोकांचे लक्ष वेधून घेतले असले तरी निर्मात्यांनी रिलीज केलेल्या पहिल्या गाण्यात मानवी भावभावनांवर जास्त भर दिला आहे.

अमल मलिक यांनी आपल्या गाण्यातून तापसी पन्नू च्या पात्राची आपला प्रियकर आणि कुटुंब यापैकी एकाची निवड करण्याची द्विधा मनःस्थिती दाखवली आहे.

चित्रपटात तापसी पन्नूचे पात्र नैना सैठीचे अफैर असते. तिचं अफैर करण्या मागचं कारण या गाण्यात दाखवले आहे.

गाण्यातील दृश्यांमध्ये नैना कशी या केसमध्ये अडकली आहे तर दुसरीकडे तिचे कुटुंबीय सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवत नाहीत हे दिसून येते. त्यामुळे ती एकटी पडली आहे.

कुमार यांचे शब्द संकटात सापडलेल्या स्त्रीचे दुःख अगदी प्रभावीपणे दर्शवतात. तिच्या मनातील निराशा, अपराधी भावना त्यांनी शब्दातून योग्य पद्धतीने मांडली आहे. गाण्यात नवेपणा असला तरी शब्द असले लक्षणीय काही नाही.

त्याची कमी अमाल मालिकांच्या संगीताने भरून काढली आहे. व्हायोलिन ने सुरुवात करून दुखी भाव दाखवला आहे. जरी या अगोदर अश्या पद्धतीची अनके गाणी आली असली तरी 'क्यों रब्बा' हे गाणे उत्तम झाले आहे.

अरमान मलिक यांचा आवाज या गाण्याला अगदी चपखल बसतो. त्यांनी अगदी सहज हे गाणे गायले आहे.

बदला चे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले असून ८ मार्च ला चित्रपट रिलीज होईल. गाणे खाली पहा.

Related topics

Song review