दिनेश एस यादव दिग्दर्शित या चित्रपटात भारतीय बाजारपेठेतील चाइनीज उत्पादना विरुद्ध एका माणसाच्या लढाईची कहाणी आहे.
वाह जिंदगी पोस्टर – मेक इन इंडियावर आधारित चित्रपटात संजय मिश्र आणि विजय राज
Mumbai - 20 Feb 2019 12:51 IST
Updated : 27 Feb 2019 20:56 IST
Suparna Thombare
वाह जिंदगी च्या पोस्टर मध्ये चित्रपटातील बहुतेक सर्व महत्वाचे कलाकार दिसत आहेत. संजय मिश्र, विजय राज, प्लाबिता बोरठाकूर, नवीन कस्तुरीया आणि मनोज जोशी आपल्याला या पोस्टरमध्ये दिसत आहेत.
हा चित्रपट मेक इन इंडिया या संकल्पनेवर आधारित आहे ज्यात चाइनीज वस्तूंनी भरलेल्या भारतीय बाजारपेठेत स्वतः बनवलेल्या वस्तू विकायचा प्रयत्न करत आहे. आणि हे एका लव्ह स्टोरीतून दाखवले जाणार आहे.
दिनेश एस यादव यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. अशोक चौधरी यांनी शिवाजा फिल्म्स बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे.
"राजस्थानचा एक व्यक्ती भारतीय बाजारपेठेत चाइनीज उत्पादनांच्या भडिमारा विरुध आवाज उठवतो. तो स्वतः वस्तू बनवतो आणि चाइनीज उत्पादन विरुद्ध लढतो. २००७ मध्ये चाइनीज प्रोडक्ट्सच्या भारतीय बाजारपेठेतील भडिमारामुळे लाखो भारतीयांचा व्यवसाय बुडाला होता," बिजिनेस स्टॅन्डर्स वर्तमानपत्राशी बोलताना यादव म्हणाले.
त्याच इंटरव्यू मध्ये त्यांनी स्पष्ट केले की त्यांचा मेक इन इंडिया शी संबंधित कोणत्याही राजकीय संघटनेशी कसलेही घेणं देणं नाही.
"मेड इन इंडिया ही संकल्पना महात्मा गांधींनी रुजवली तत् मेक इन इंडिया ही संकल्पना नरेंद्र मोदींनी आणली. मी हा चित्रपट काँग्रेस अथवा भाजप यांपैकी कोणाच्याही दृष्टिकोनातून बनवत नाही. हे एका भारतीय व्यक्तीची कथा आहे."
गेल्या वर्षी रिलीज झालेल्या अनुष्का शर्मा आणि वरून धवन यांची भूमिका असलेला सुई धागा – मेड इन इंडिया सुद्धा याच विषयावर आधारित होता.
Related topics
Poster review