अर्जुन रेड्डी च्या तमिळ रीमेक वर्मा मध्ये बाणिता सांधू यांची निवड झाल्याची बातमी आता सर्वसामान्य झाल्यानंतर त्यांनी द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलय की त्यांची इच्छा आहे की वर्मा अर्जुन रेड्डी ने उंचावलेल्या अपेक्षांना खरा उतरेल.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी घोषणा केलेली की दिग्दर्शक बाला च्या व्हर्जन ने नाखूष आहेत म्हणून ते संपूर्ण चित्रपट पुन्हा शूट करणार आहेत.
वर्मा या मार्च मध्ये रिलीज होणार होता. हा विक्रमचा मुलगा ध्रुवचा पहिलाच चित्रपट आहे. यात ते विजय देवराकोंडा यांनी केलेली भूमिका साकारणार आहेत.
बाणिता पुढे म्हणाल्या, "मला या अगोदर सुद्धा काही हिंदी आणि साऊथ च्या चित्रपटांची ऑफर आलेली पण मी योग्य चित्रपटाची वाट पाहत होते. त्यामुळे या चित्रपटासाठी मला विचारण्यात आले तेव्हा मी नाही म्हणूच शकत नव्हते. मी अर्जुन रेड्डी पहिला आहे, आशा आहे की आमचा चित्रपट अर्जुन रेड्डी इतकाच चांगला असेल. आम्ही शूटिंगचे दिवस अजून निश्चित केले नाहीत."
चित्रपटाचा दिग्दर्शक कोण असेल याची निर्मात्यानी अजून अधिकृत घोषणा केली नसली तरी गौतम मेनन किंवा प्रथमच दिग्दर्शन करणारे गिरीसय्या यांच्या नावाची चर्चा आहे.
गिरीसय्या यांनी दिग्दर्शक संदीप रेड्डी यांच्या बरोबरअर्जुन रेड्डी चित्रपटा दरम्यान सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
अर्जुन रेड्डी चित्रपटात विजय देवराकोंडा यांनी एका दारूचे व्यसन लागलेल्या प्रियकराची भूमिका केली होती.