{ Page-Title / Story-Title }

News Hindi

मेघना गुलजार यांनी छपाक चित्रपटाचा पहिला स्प्लॅश शेर केला

Read in: English | Hindi


दीपिका पदुकोण आणि विक्रांत मसी यांची प्रमुख भूमिका असलेला छपाक ऍसिड हमल्यात बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

Shriram Iyengar

दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी आपला पुढील चित्रपट छपाक चा पहिला फोटो शेर केला. हा चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोणचा निर्माता म्हणून पहिलाच आहे, चित्रपटात त्याच प्रमुख भूमिका करणार आहेत.

लक्ष्मी अगरवाल यांच्यावर आधारित हा चित्रपट ऍसिड हमला आणि त्यातून जिद्दीने बाहेर येण्याची त्यांची गोष्ट सांगणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Prep. #chhapaak

A post shared by Meghna Gulzar (@meghnagulzar) on

दुपट्ट्यावर ऍसिडमुळे पडलेली छिद्रे दाखवणाऱ्या या फोटोतून नेमका हमल्याचा क्षण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे असे वाटते. ऍसिडमुळे पडलेली ही छिद्रे खूप वेळ स्मरणात राहतील.
दीपिका पदुकोण ने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ट्वीट करून आपण या प्रोजेक्ट मध्ये असल्याची बातमी दिली होती.

२०१८ मध्ये दीपिका पदुकोणचा पद्मावत हा एकाच चित्रपट रिलीज झाला होता पण हा त्यांच्या कारकिर्दीतला सर्वात महत्वाचा चित्रपट ठरला. मेघना गुलजार यांनी सुद्धा २०१८ मध्ये राझी हा हिट चित्रपट दिला होता. या चित्रपटात आलीया भट्ट ह्यांची प्रमुख भूमिका होती.

पदुकोण यांच्या अनाउंसमेंटवर मेघना गुलजार यांनी प्रतिक्रिया दिली की "त्यांनी इतक्या पटकन हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला यासाठी मी त्यांची आभारी आहे. जेव्हा तुम्ही दीपिका सारख्या अतिशय सुंदर चेहऱ्याला ऍसिड हमल्यात बचावलेला चेहरा म्हणून दाखवता तेव्हा त्याचा प्रभाव कित्येक पटीने वाढतो."

चित्रपट मार्च २०१९ मध्ये रिलीज होईल अशी चर्चा होती परंतु अजून चित्रपटाच्या रिलीजबद्दल कोणतीही बातमी आलेली नाही.

Related topics

Poster review