गली बॉय ला यु/ए सर्टिफिकेट मिळाले असून येत्या व्हॅलेंटाइन डे म्हणजेच १४ फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होईल.
रणवीर आणि आलिया यांचे चुंबनदृश्य कापा, दारु ब्रॅंडिंग हटवा – सीबीएफसी ने गली बॉय ला सुचवले
Mumbai - 13 Feb 2019 14:46 IST
Updated : 14 Feb 2019 20:30 IST
Mayur Lookhar
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन अर्थात सीबीएफसी ने गली बॉय च्या निर्मात्यांना रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचे चुंबनदृश्यची लांबी कमी करण्यास आणि काही शिवराळ शब्द काढून टाकण्यास सांगितले आहे.
सेन्सर बोर्ड ने निर्मात्यांना एका अल्कोहोल प्रोडक्ट चे ब्रॅण्डिंग हटवण्यास सुद्धा सांगितले आहे, विशेष म्हणजे हा ब्रँड चित्रपटाचा मीडिया पार्टनर आहे.
गली बॉय ला सेन्सर बोर्डाकडून यु/ए सर्टिफिकेट मिळाले आहे. चित्रपट व्हॅलेंटाइन दिवशी म्हणजेच १४ फेब्रुवारीला रिलीज होईल.
सेन्सर ने निर्माते एक्सेल एंटरटेनमेंट ला चित्रपटातील चुंबनदृश्य १३ सेकंदांनी कमी करण्यास सांगितले.
सीबीएफसी ने तो सीन वाइड अँगल मध्ये दाखवण्याचं सुचवलं आहे.
त्यांनी काही शिवराळ शब्द काढून टाकण्यास आणि काही शब्द बीप करण्यास सांगितले आहेत.
निर्मात्यांना चित्रपटाचे मीडिया पार्टनर रॉयल स्टॅग या दारु ब्रँड चे नाव हटवण्यास सांगितले आहे.
भारतीय कायद्यानुसार दारु ची जाहिरात दाखवणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे काही ब्रँड्स सरोगेट मार्केटिंग चा वापर करतात. यामध्ये ते सोडा अथवा मिनरल वॉटर च्या नावाखाली स्वतःची जाहिरात करतात.
निर्माते रितेश सिधवानी यांना सीबीएफसी च्या सूचनांवर काहीच हरकत नाही. "आम्हाला हे मान्य आहे," सिधवानी हिंदुस्तान टाइम्स वर्तमानपत्राला म्हणाले.
सीबीएफसी च्या जवळच्या सूत्रानुसार "या सूचना अपेक्षितच होत्या. निर्मात्यांना देखील त्या अपेक्षितच होत्या. ते चित्रपटात उगाच अश्लील दृश्ये आणि शिवराळ भाषा वापरतात तेव्हा त्यांनाही ठाऊक असते की त्यातले काही सीन्स कापले जाणार. शेवटी कोणालाच ए सर्टिफिकेट नको असते. गली बॉय ला यु/ए सर्टिफिकेट भेटले आहे."
गली बॉय मध्ये एका स्ट्रीट रॅपर (रणवीर सिंग)चा झोपडपट्टी ते लोकप्रिय रॅपर हा प्रवास दाखवला आहे.
Related topics
Censorship