ह्रितिक रोशन अभिनीत या चित्रपटाच्या निर्मात्यांनी पुढे सांगितले की जर विकास बहल यांना कोर्टाने निर्दोष घोषित केले तर आम्ही त्यांना क्रेडिट देण्यावर पुनर्विचार करू शकतो.
सुपर ३० मध्ये विकास बहल यांचे नाव दिले जाणार नाही, रिलायन्स एंटरटेनमेंट ने केले स्पष्ट
Mumbai - 13 Feb 2019 11:30 IST
Updated : 15 Feb 2019 22:21 IST
Our Correspondent
रिलायन्स एंटरटेनमेंट ग्रुप चे सीईओ शिबाशिष सरकार यांनी ह्रितिक रोशन अभिनयीत सुपर ३० च्या दिग्दर्शक च्या क्रेडिटवरून उठणाऱ्या अफवांवर कायमचा पडदा टाकला आहे.
चित्रपटात कोणालाच दिग्दर्शकाचे क्रेडिट दिले जाणार नाही.
मुंबई मिरर या वृत्तपत्राला दिलेल्या विधानामध्ये शिबाशिष सरकार म्हणाले, "कोणालाच दिग्दर्शकाचे क्रेडिट दिले जाणार नाही." ते पुढे म्हणाले की बहल पोस्ट-प्रोडक्शन च्या कोणत्याच प्रोसेस मध्ये सहभागी नाहीत. आणि चित्रपट इन-हाऊस पार्टनरच्या मदतीने पूर्ण केला जात आहे.
फँटम च्या संस्थापकां पैकी एक असलेले विकास बहल वर २०१५ मध्ये बॉम्बे वेलवेटच्या प्रमोशन वेळी एका महिला कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप लावला होता.
२०१८ पर्यंत अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांच्याशी तणाव वाढून शेवटी फँटम ला टाळे लागले.
अनुराग कश्यप आता सुपर ३० ची एडिटिंग करणार आहेत. सरकार म्हणाले, "अनुराग आमचे पार्टन आहेत, त्यांनी फँटमच्या पार्टनर्सचे इतर चित्रपटांच्या एडिटिंग केले आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट च्या विनंतीचा मान राखत आणि इतर व्यावसायिक गोष्टी लक्षात घेता अनुराग यांनी एडिटिंगची जबाबदारी स्वीकारली."
पुढे सरकार म्हणाले की "त्यांना चित्रपटात कोणतेही क्रेडिट दिले जाणार नाही ही गोष्ट सुद्धा अनुराग ने मान्य केली. चित्रपटाचे नायक ह्रितिक रोशन यांचा या सर्वामध्ये काहीच सहभाग नव्हता.
"विकास बहल यांना याबद्दल अगोदरच कळवण्यात आले आहे त्यांना चित्रपटापासून वेगळं होण्यासाठी योग्य रक्कम देण्यात आली आहे."
स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची बहल यांची लढाई चालू आहे. सरकार यावर म्हणाले, "जर चित्रपट रिलीज होण्या अगोदर ते कोर्टाकडून अथवा कोणा मान्यताप्राप्त संस्थेसमोर निर्दोष असल्याचं सिद्ध करू शकले तर आम्ही त्यांना दिग्दर्शकाचे क्रेडिट देण्यावर नक्कीच विचार करू."
सुपर ३० चित्रपट २६ जुलै २०१९ ला रिलीज होईल.
Related topics
Sexual harassment