ट्रेलरमध्ये यशस्वी मंगळस्वारी च्या अगोदर फसलेले प्रयत्न दाखवले आहे.
या मिशन मंगल ट्रेलरमध्ये विद्या बालन अक्षय कुमार ह्यांच्या मागे यशापयशात खंबीरपणे उभ्या आहेत
मुंबई - 08 Aug 2019 16:00 IST
Updated : 09 Aug 2019 2:29 IST
Shriram Iyengar
जगन शक्ती दिग्दर्शित मिशन मंगलचा नवीन ट्रेलर आज रिलीज झाला. पहिल्या ट्रेलरमध्ये आपल्याला या मिशनवर काम करणाऱ्या स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि आयुष्याबद्दल माहिती दिली होती तर या नवीन ट्रेलरमध्ये हे मिशन यशस्वी होण्यासाठी कोणते अडथळे आले हे दाखवले आहे.
जगन शक्ती दिग्दर्शित या चित्रपटात विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, कीर्ती कुल्हारी, नित्य मेनन आणि अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपट १५ ऑगस्ट ला रिलीज होईल.
लेखक आणि क्रिएटिव्ह डिरेक्टर आर बल्की, ज्यांचे नाव पहिल्या ट्रेलर मध्ये कुठेच उल्लेखले नव्हते, या नवीन ट्रेलरमध्ये मात्र त्यांच्या नावाचा उल्लेख आहे.
ट्रेलरच्या सुरुवातीला इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इसरो) च्या यशस्वी मंगळस्वारी अगोदर फसलेले प्रयत्न दाखवले आहे.
एका पत्रकार परिषदेमध्ये मोहन कुमार ह्यांचे पात्र अक्षय कुमार ह्यांना विचारते की मिशनमध्ये अपयश आले तरी तुम्ही लाडू का खात आहात? अक्षय कुमार लगेच त्याला प्रत्युत्तर देतात, "लाडू वर असे कुठे लिहलय की अपयश आल्यावर लाडू खाऊ नये?"
राकेश धवन (अक्षय कुमार) ला या मिशन दरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, जसे काही अनुभवी शास्त्रज्ञ स्वतः येण्याऐवजी आपल्या ज्युनियरला या मिशनवर काम करण्यासाठी पाठवतात, एका गांधी (सोनाक्षी सिन्हा) ला इसरो सोडून जायचे आहे. या समस्यांमुळे ट्रेलर अधिक प्रभावशाली झाला आहे.
या सर्व समस्यांदरम्यान विद्या बालनचे पात्र तारा शिंदे अक्षय कुमारच्या मागे खंबीरपणे उभी असते. या मिशनवर तिचा असलेला विश्वास आणि त्यासाठी ती करत असलेले प्रामाणिक प्रयत्न हे ट्रेलरमधील काही सर्वोत्कृष्ट क्षण आहेत.
जगन शक्ती दिग्दर्शित मिशन मंगल १५ ऑगस्ट ला रिलीज होईल. ट्रेलर खाली पहा.
Related topics
Trailer review