{ Page-Title / Story-Title }

News Hindi

सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाविरुद्ध असलेले सर्व आक्षेप उद्या रेकॉर्डवर नमूद करण्यास सांगितले

Read in: English | Hindi


पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात यावी यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Shriram Iyengar

चित्रपट न पाहता पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाच्या रिलीज ने आचारसंहितेचा भंग होईल का हे ठरवणे अयोग्य ठरेल, असे सुप्रीम कोर्टाने नमूद केले.

चित्रपटाची रिलीज डेट बदलण्याविषयीची याचिकेवर सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना त्यांचे सर्व आक्षेप नमूद करून उद्या कोर्टात दाखल करण्यास सांगितले.

चित्रपटाची रिलीज थांबवण्याविषयी ही याचिका दाखल केली होती. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीच्या दिवशीच, म्हणजेच ११ एप्रिल ला, हा चित्रपट रिलीज होणार आहे. मतदारांवर चित्रपटाचा प्रभाव पडेल म्हणून चित्रपटाची रिलीज थांबवावी असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

या अगोदर विरोधी पक्षांनी निवडणूक आयोग आणि मुंबई व दिल्ली हाय कोर्टात चित्रपटाच्या रिलीज विरुद्ध याचिका दाखल केल्या होत्या, परंतु दोघांनीही यावर निर्णय देण्यास असमर्थता दर्शवली.

चित्रपट न पाहता त्यात आचारसंहितेचा भंग होतो का हे ठरवणे शक्य नाही, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. बारअँडबेंच.कॉम या वेबसाइट मध्ये आलेल्या माहितीनुसार कोर्टाने याचिकाकर्त्यांना उद्या ९ एप्रिल पर्यंत त्यांचे सर्व आक्षेप नमूद करून कोर्टापुढे मांडण्यास सांगितले.

परंतु कोर्टाने याचिकाकर्त्यांना रिलीज अगोदर चित्रपटाची कॉपी मिळवून देण्यास सुद्धा नकार दिला.

काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अमन पनवर यांनी ४ एप्रिल ला ही याचिका दाखल केली होती. बारअँडबेंच.कॉम मध्ये आलेल्या वृत्तानुसार पनवर यांनी आपल्या याचिकेत म्हटले की हा चित्रपट म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षाला फायदा करून देण्यासाठी बनवण्यात आलेला प्रोपगंडा आहे.

निवडणूक आयोगा समोर चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले की त्यांचा भारतीय जनता पक्षाशी काहीही संबंध नाही.

गेल्याच आठवड्यात भाजप साठी कॅम्पेन करण्यासाठी विवेक ओबेरॉय ला साइन केले आहे. विवेक ओबेरॉय ने नुकतेच सांगितले की ते २०२४ मध्ये निवडणूक लढवण्यास तयार आहेत.

पीएम नरेंद्र मोदी चे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे.

Related topics