फिल्म स्टार होण्याची स्वप्न पाहणाऱ्या सोलापूरमधल्या मिथुन नावाच्या तरुणाची भूमिका अभिनय साकारत आहेत.
हिंदी सिनेमाच्या वेडाने पछाडलेल्या तरुणाच्या भूमिकेत अभिनय बेर्डे
मुंबई - 05 Apr 2019 17:07 IST
Updated : 08 Apr 2019 17:37 IST
Keyur Seta
वर्षाच्या सुरुवातीला रवी जाधव यांनी रंम्पाट मधल्या प्रमुख कलाकाराचा व्हिडिओ रिलीज केला होता, पण त्यात त्याच्या चेहरा दिसत नसल्यामुळे ही भूमिका नक्की कोण साकारत आहे हे माहित नव्हते.
पण नुकतेच रवी जाधव यांनी त्यांच्या फेसबुक पेज वरून प्रमुख कलाकाराचा आणखी एक व्हिडिओ शेर केला. या व्हिडिओमुळे तो कलाकार अभिनय बेर्डे आहे हे स्पष्ट होते.
चित्रपटात अभिनय बेर्डे सोलापुरात राहणाऱ्या मिथुन नावाच्या तरुणाची भूमिका करत आहेत. त्याला फिल्म स्टार होण्याचे स्वप्न आहे. तो मिथुन चक्रवर्ती आणि अमिताभ बच्चन यांची स्टाइल कॉपी करतो. तो सोलापुरी लहेज्यात हिंदी डायलॉग्स बोलतो.
अभिनय बेर्डे या व्हिडिओत आत्मविश्वासू आणि उत्साही दिसतात. फराह खानच्या ओम शांती ओम (२००७) या चित्रपटाप्रमाणे या चित्रपटात सुद्धा ७०च्या दशकातल्या हिंदी सिनेमाला ट्रिब्यूट दिला आहे. पण दोन्ही चित्रपटांमधले साम्य इथेच संपते.
टीजरमधला वैभव मांगलेने म्हटलेला 'कितना नया है यह' हा संवाद टीजरमधली सगळ्यात बेस्ट गोष्ट होती. रवी जाधव यांच्या टाईमपास (२०१४) मधला हा खूप प्रसिद्ध संवाद आहे. ज्यांनी तो चित्रपट पहिला असेल त्यांना हा संवाद टीजरमध्ये ऐकल्यावर नक्कीच हसू आले असेल. काहीच दिवसांत या संवादावरून सोशल मीडियावर मीम्स पाहायला मिळतील.
नायिकेचा चेहरा अजून तरी रिव्हील करण्यात आलेला नाही. कदाचित या सारखा आणखी एका व्हिडिओतून तिच्या पात्राची देखील ओळख करून दिली जाईल.
रंम्पाट १७ मे ला रिलीज होणार आहे. खाली टीजर पहा आणि तुम्ही चित्रपट पाहायला उत्सुक आहात का ते आम्हाला कळवा.
Related topics
Teaser review