News Marathi

दिठी पोस्टर: सुमित्रा भावेंचा पुढील चित्रपट आश्वासक वाटतो

किशोर कदम, मोहन आगाशे आणि दिलीप प्रभावळकर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत.

सुमित्रा भावेंच्या दिठी मध्ये किशोर कदम, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, उत्तरा बावकर, गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, शशांक शेंडे, कैलाश वाघमारे आणि ओंकार गोवर्धन अशी दिग्गज कलाकारांची फौज आहे.

पहिल्या पोस्टर मध्ये आपल्याला दिसते की सर्व कलाकार वारकऱ्यांच्या पोशाखात एका टेम्पोत बसले आहेत. ते सर्व सामान्य वारकऱ्यांसारखेच दिसत आहेत. वारकऱ्यांच्या प्रवासावर हा चित्रपट आधारित आहे असे पोस्टर पाहून वाटते.

सुमित्रा भावेंनी नेहमी सुनील सुखतणकर यांच्याबरोबर मिळून चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, पण प्रथमच त्या स्वतः दिग्दर्शन करणार आहेत.

मोहन आगाशे, गिरीश कुलकर्णी आणि दिलीप प्रभावळकर.

गेल्या वर्षी दिठी साठी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुमित्रा भावेंना उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला होता. चित्रपटाला प्रेक्षक पसंती पुरस्कार तसेच दिठी साठी धनंजय कुलकर्णींना उत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार सुद्धा मिळाला.

मोहन आगाशेंनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुमित्रा भावेंचा या अगोदरचा चित्रपट कासव (२०१७) ची निर्मिती आणि अस्तु (२०१४) ची सह-निर्मिती सुद्धा मोहन आगाशेंनीच केलेली.

निर्मात्यांनी मोहन आगाशे, गिरीश कुलकर्णी आणि दिलीप प्रभावळकर यांचा चित्रपटातील एक फोटोसुद्धा रिलीज केला आहे.