करण जोहर ने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी शाह रुख खान यांना घेऊन कलंक बनवण्याचे ठरवलेले पण काही कारणास्तव हे पूर्णत्वास जाऊ शकले नाही त्यामुळे आता वरुण धवन जफर ची भूमिका साकारत आहेत.
ट्रेलर लॉन्चच्या वेळी धवन यांना याबाबत विचारण्यात आले की त्यांची शाह रुख खान बरोबर कोणती चर्चा झाली का?
"मी शाह रुख सरांना एका आठवड्यापूर्वी भेटलो तेव्हा चित्रपटाचा टीजर दाखवला आणि त्यांची प्रतिक्रिया विचारली. त्यांना टीजर आवडला. त्यांना माझ्या सुर्मा घातलेल्या लुक विषयी विचारले असता त्यांनी मी प्रेक्षकांच्या अधिक जवळ घेऊन जाणाऱ्या अश्या वेगवेगळ्या भूमिका निवडत आहे याबद्दल माझे कौतुक केले," धवन म्हणाले.
अभिषेक वर्मन दिग्दर्शित कलंक मध्ये आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित नेने, संजय दत्त या कलाकारांच्या सुद्धा महत्वाच्या भूमिका आहेत. १९४७ च्या भारत-पाक विभाजनादरम्यान घडणारी ही लव्ह स्टोरी आहे.
शाह रुख खान कडून जफरच्या भूमिके विषयी काही टिप्स घेतल्या का असे विचारल्यावर धवन म्हणाले, "मी त्यांना या बाबतीत कधीच काही विचारले नाही."
वर्मन ने पहिल्यांदा कलंक चे कथानक केव्हा ऐकले याचा किस्सा धवन ने सांगितला. "वर्मन आणि मी माय नेम इज खान (२०१०) वर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होतो. अभिषेक आणि मी तेव्हा एकाच रूम मध्ये राहत होतो. त्यावेळी अभिषेकला करण जोहर ने ही कथा ऐकवली होती. पण तेव्हा कोणीच विचार केला नव्हता की अभिषेक या चित्रपटाचे दिग्दर्शन करेल आणि मी स्वतः चित्रपटात अभिनय करेन," धवन म्हणाले.
कलंक १७ एप्रिल ला रिलीज होईल.