{ Page-Title / Story-Title }

News Hindi

कलंक ट्रेलर – १९४७ च्या भारत-पाक विभाजनाच्या पार्श्वभूमीवर बेतलेली आलिया भट्ट आणि वरूण धवन यांची लव्ह स्टोरी

Read in: English | Hindi


प्रेम आणि सन्मान या दोन निवडींमध्ये फसलेली पात्रं ट्रेलरमध्ये दिसतात. अभिषेक वर्मन दिग्दर्शित कलंक १७ एप्रिल ला रिलीज होईल.

Shriram Iyengar

मानवी नातेसंबंधांविषयी करण जोहर चे आकर्षण त्यांनी निर्माता म्हणून तसेच अबाधित ठेवले आहे. धर्मा प्रोडक्शन्स निर्मित कलंक मध्ये दिग्दर्शक अभिषेक वर्मन ने आलिया भट्ट, वरूण धवन, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांचे गुंतागुंतीचे नातेसंबंध दाखवले आहेत.

ट्रेलरमध्ये भव्यदिव्य प्रोडक्शन पाहून अभिषेक वर्मनचा हा चित्रपट किती ग्रँड असेल याचा अंदाज आपण बांधू शकतो.

देव (आदित्य रॉय कपूर), रूप (आलिया भट्ट) आणि जफर (वरुण धवन) या तीन पात्रां भोवती चित्रपटाचे कथानक फिरते. ट्रेलर पाहून असा अंदाज येतो की देवचे सत्या (सोनाक्षी सिन्हा) बरोबर लग्न झाले आहे पण काही कारणास्तव त्याला रूप बरोबर दुसरे लग्न करावे लागत आहे.

"ये काम अपने हयात मे ना कर पायी तो मरने के बाद भी पछताऊँगी," सोनाक्षी सिन्हा च्या संवादावरून त्यांच्या पात्राची हतबलता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. देव आणि रूप यांचे एकमेकांवर प्रेम नाही आणि त्यामुळेच रूप जफरकडे आकर्षित होते.

ट्रेलरमध्ये तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक एकापेक्षा एक उत्कृष्ट संवांद आहेत. प्रेम आणि सन्मान या दोन निवडींमध्ये फसलेली पात्रं ट्रेलरमध्ये दिसतात.

ट्रेलर च्या शेवटी देव रूपच्या प्रेमात पडल्यानंतर देखील तिला जफरची भेट घडवून आणण्यास मदत करतो असे दृश्य आहे. या अगोदर देखील अनेक चित्रपटांत आपण अशी दृश्ये पाहिली आहेत. ट्रेलरमध्ये अगदी एका क्षणासाठी आपल्याला जफर आणि देव एकत्र दिसतात.

ट्रेलरच्या सुरुवातीला आलिया भट्ट यांचा एक संवाद आहे, "मेरे गुस्से में लिये गये फैसले ने हम सब की जिंदगी बदल दी." रूपच्या देवशी लग्न करण्याच्या निर्णयावर हा संवाद प्रकाश टाकतो.

बहार बेगम (माधुरी दीक्षित नेने) हे सुद्धा एक इंटरेस्टिंग पात्र आहे.

वरुण धवन, आदित्य रॉय कपूर आणि आलिया भट्ट तिघेही आपापल्या भूमिकेत उठून दिसतात. वरुण धवन जफरच्या भूमिकेत शोभतात.

भारत-पाक विभाजना दरम्यान पेटलेल्या दंगलीवर कुणाल खेमूच्या भूमिकेतून प्रकाश टाकला आहे. संजय दत्त यांची सुद्धा चित्रपटात महत्वाची भूमिका आहे असे वाटते.

उच्च दर्जाचे प्रोडक्शन आणि बदला व प्रेम याचे अनोखे मिश्रण असलेल्या या ट्रेलरने प्रेक्षकांच्या चित्रपटाविषयी असलेल्या अपेक्षा आणखी उंचावल्या असतील. अभिषेक वर्मन दिग्दर्शित कलंक १७ एप्रिल ला रिलीज होईल. 

ट्रेलर खाली पहा आणि तुम्ही चित्रपट पाहण्यास उत्सुक आहात का नाही ते आम्हाला कळवा.

Related topics

Trailer review