{ Page-Title / Story-Title }

News Hindi

कंगना रनौत ने राजकुमार राव बरोबर अनुराग बसु दिग्दर्शित इमली तून घेतली माघार

Read in: English | Hindi


कंगना रनौत यांना त्यांच्या दिग्दर्शनावर जास्त लक्ष्य द्यायचा आहे.

Our Correspondent

काही दिवसांपूर्वी कंगना रनौत ने अनुराग बसु दिग्दर्शित इमली चित्रपट साइन केल्याची बातमी आली होती. पण आता कंगनाला दिग्दर्शनावर भर द्यायचा आहे म्हणून त्यांनी इमली चित्रपटातून माघार घेतली आहे.

क्वीन (२०१४) आणि मेंटल है क्या (२०१९) नंतर कंगनांचा हा राजकुमार राव बरोबर तिसरा चित्रपट असला असता.

या निर्णयाबद्दल बोलताना कंगना म्हणाल्या, "नव्हेंबर २०१८ पासून इमली ची शूटिंग सुरु होणार होती, परंतु मला मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी चे शूटिंग पूर्ण करायचे होते म्हणून मला इमलीची शूटिंग पुढे ढकलावी लागली. त्यानंतर लगेच पंगाची शूटिंग देखील सुरु झाली, म्हणून मला या चित्रपटातून माघार घ्यावी लागली."

मेंटल है क्या व्यतिरिक्त कंगना अश्विनी तिवारींची पंगा आणि जयललितांच्या जीवनपटामध्ये अभिनय करणार आहेत.

रनौत ने सांगितले की जेव्हा त्यांनी अनुराग बसु यांना आपल्या निर्णयाबद्दल सांगितले तेव्हा अनुराग ने देखील त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला.

"अनुराग आणि मी याबद्दल चर्चा केली. इमली मुळे मला माझ्या मेंटॉर बरोबर पुन्हा काम करण्याची संधी मिळाली होती, परंतु मी लवकरच एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे आणि त्यामुळे मला या चित्रपटातून माघार घ्यावी लागत आहे."

रनौत म्हणाल्या की मणिकर्णिका नंतर त्यांना दिग्दर्शनामध्ये आणखी इंटरेस्ट आला आहे आणि जयललिता यांचा जीवनपटसुद्धा त्यांनी याच साठी स्वीकारला की जयललितांचे पात्र कंगनांच्या व्यक्तिमत्वाशी आणि विचारसरणीशी मेळ खाते.

गँगस्टर (२००६) आणि काइट्स (२०१०) नंतर इमली हा अनुराग बसु बरोबर कंगनांचा तिसरा चित्रपट असला असता.

क्रिश यांच्या दिग्दर्शनावर असंतुष्ट निर्मात्यांनी मणिकर्णिका च्या दिग्दर्शनाची जबाबदारी कंगनांवर सोपवली. दिग्दर्शनाचे क्रेडिट दोघांनाही देण्यात आले होते.

Related topics