{ Page-Title / Story-Title }

News Marathi

जजमेंट ट्रेलर – जेव्हा मुलगीच आपल्या वडिलांविरुद्ध उभी राहते

Read in: English


मंगेश देसाई प्रथमच खलनायकाच्या भूमिकेत या चित्रपटात दिसतील.

Keyur Seta

खून अथवा खुनी व्यक्तीच्या कथा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये फार क्वचितच पाहायला मिळतात. दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांच्या जजमेंट मध्ये मंगेश देसाई अशाच एका गुन्हेगाराची भूमिका साकारत आहेत. तेजश्री प्रधान त्यांच्या मुलीची भूमिका साकारत आहेत.

ट्रेलर पाहता असे लक्षात येते की हा कोर्ट ड्रामा असेल. कथेची सुरुवात होते जेव्हा तेजश्री प्रधान यांचे पात्र ऋतुजा साटम लहान असताना आपल्या आय ए एस वडिल अग्निवेश साटमच्या हातून आपल्या आईचा खून होताना पाहते. तरीही ती कोर्टात खोटी साक्ष देते कारण तिला कोणीतरी सांगते की तिचे वडील जेल मध्ये गेले तर ती आणि तिची बहीण यांची काळजी कोणही घेणार नाही. पण आता १५ वर्षानंतर वकील बनल्यानंतर ती पुन्हा केस ओपन करते.

माजी आय ए एस अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या ऋण या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. ट्रेलर लॉन्च दरम्यान त्यांनी म्हटले की ही कथा खऱ्या घटनेवर आधारित आहे.

कथा खूप इंटरेस्टिंग आहे. मुलगीच आपल्या वडिलांविरुद्ध केस दाखल करत आहे हे आपल्याला क्वचितच पाहायला मिळते.

पण चित्रपटाचा ट्रेलर मात्र तितक्या ताकदिचा बनला नाही. कर्णकर्कश पार्श्वसंगीतामुळे काही संवाद ऐकायला येत नाहीत.

एक अलबेला (२०१६) या भगवान दादा यांच्या जीवनपटातल्या अभिनयामुळे प्रसिद्धी झोतात आलेले मंगेश देसाई प्रथमच खलनायकाच्या भूमिकेत दिसतील.

जजमेंट २४ मे ला रिलीज होईल. खाली ट्रेलर पहा आणि तुम्ही चित्रपट पाहण्यास उत्सुक आहेत का ते आम्हाला कळवा.

Related topics

Trailer review