News Hindi

गली बॉय मधल्या एम सी शेर पात्रावर एक चित्रपट बनणार?

याच वर्षी मार्च मध्ये झोया अख्तर यांनी म्हटले होते की त्या आणि सह-लेखिका रीमा कागती अजून एक हिप-हॉप चित्रपट बनवणार आहेत.

एका रिपोर्टनुसार झोया अख्तर गली बॉय मधल्या एम सी शेर पात्रावर एक चित्रपट बनवणार आहेत. सिद्धांत चतुर्वेदी यांनी हे पात्र साकारले होते. आलिया भट्ट आणि रणवीर सिंह सारख्या बड्या कलाकारांच्या उपस्थितीसुद्धा त्यांचे पात्र प्रेक्षकांच्या मनाला भिडले.

एका सूत्रानुसार निर्मात्यांनी म्हटले, "सिद्धांत चे पात्र एम सी शेर प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध झाले. फॅन्स या पात्राविषयी आणखी माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहेत, म्हणूनच आम्ही खास  एम सी शेर च्या पात्रावर चित्रपट बनवायचा विचार करत आहोत."

झोया अख्तर अथवा इतर कोणीही यावर कोणतेही अधिकृत विधान अद्याप केलेले नाही. पण मार्च मध्ये झोया अख्तर यांनी म्हटले होते की त्या आणि सह-लेखिका रीमा कागती अजून एक हिप-हॉप चित्रपट बनवणार.

"मी आणि माझी सह-लेखिका रीमा कागती आम्हा दोघांना असे वाटते की भारतातल्या हिप-हॉप संस्कृतीबद्दल अजून खूप काही सांगण्यासारखे आहे. त्यामुळे याच विषयावर अजून एक चित्रपट आम्ही लिहत आहोत," डेक्कन क्रोनिकल वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत झोया अख्तर ने म्हटले होते.

तापसी पन्नू अभिनित नाम शबाना (२०१७) हा स्पिन-ऑफ या प्रकारातला पहिलाच हिंदी चित्रपट होता. अक्षय कुमार यांच्या बेबी (२०१५) मध्ये सर्वप्रथम तापसी यांचे शबाना पात्र दिसले होते.

आता झोया आणि कागती सुद्धा गली बॉय साठी हाच मार्ग अवलंबणार आहेत असे वाटते. आणखी माहितीसाठी आम्हाला भेट देत राहा.